90 days working certificate.
नोंदणीकृत कामगारांना बांधकाम कामगार योजना अंतर्गत विविध योजनांचा लाभ मिळतो. बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी असंघटीत कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते.
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी अनेक कागदपत्रे लागतात परंतु यातील एक महत्वाचे कागदपत्र म्हणजे ९० दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र होय ज्याला इंग्रजीमध्ये 90 days working certificate असे म्हणतात.
९० दिवस बांधकाम कामगार प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बांधकाम कामगारांना खूपच अडचणी येत होत्या. या प्रमाणपत्रावर ग्रामसेवक यांची सही आणि शिक्का आवश्यक असतो.
बऱ्याच ठिकाणी बांधकाम कामगारांना ९० दिवस काम केल्याच्या प्रमाणपत्रावर ग्रामसेवक सही आणि शिक्का देत नसल्याने अशा बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी करता येत नव्हती.
बांधकाम कामगार कागदपत्रे डाउनलोड करा मोफत pdf मध्ये ओरीजनल
आता झटपट मिळणार ९० दिवसाचे प्रमाणपत्र
मुंबई येथे दिनांक ८ एप्रिल २०२५ रोजी बांधकाम कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती.
हि बैठक बांधकाम कामगार यांना देण्यात येणाऱ्या ९० दिवस बांधकाम कामगार प्रमाणपत्रावर आधारित होती. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणत बांधकाम कामगार आहेत परंतु त्यांच्याकडे ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र नसल्याने ते नोंदणी करू शकत नाहीत.
त्यामुळे अनेक बांधकाम कामगार अशा महत्वाच्या योजनांपासून वंचित राहत आहेत. याच बाबीचा विचार करून बांधकाम कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी संबधित अधिकारी यांना हे प्रमाणपत्र सोप्या पद्धतीने देण्याची सूचना केली आहे.
२०१७ च्या जीआर नुसार मिळणार प्रमाणपत्र
ग्रामविकास विभागाच्या वतीने दिनांक २२ सप्टेंबर २०१७ रोजी एक जी आर काढण्यात आला होता. यामध्ये बांधकाम कामगारांना देण्यात येणार ९० दिवस बांधकाम केल्याचे प्रमाणपत्र कसे असावे या संदर्भातील नमुना देखील या जीआर सोबत उपलब्ध करून देण्यात आला होता.
आता याच जीआर नुसार यापुढे बांधकाम कामगारांना ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवक यांनी द्यावेत अशा सूचना मंत्री फुंडकर यांनी दिल्या आहेत.
या निर्णयामुळे बांधकाम कामगारांना ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र 90 days working certificate मिळविणे अधिक सोपे होणार आहे.
बांधकाम कामगार नोंदणी केल्यानंतर मिळेल अनेक योजनांचा लाभ
ज्या बांधकाम कामगारांनी त्यांची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार यांच्याकडे नोंदणी केली आहे त्यांना शासनाकडून विविध योजनांचा लाभ दिला जातो.
बांधकाम कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार रुपये.
घरकुल योजना.
वार्षिक १२ हजार रुपये पेन्शन.
या आणि इतर अनेक योजनांचा लाभ नोंदणी केल्यानंतर बांधकाम कामगारांना मिळत असतो.