जाणून घेवूयात कशी आहे नवीन बांधकाम कामगार पेन्शन योजना bandhkam kamgar pension yojana.
बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत अशा बांधकाम कामगारांना दरवर्षी १२ हजार रुपये पेन्शन म्हणजेच निवृत्तीवेतन मिळणार आहे.
त्यामुळे तुम्ही जर बांधकाम कामगार असाल आणि तुम्ही अजूनही तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली नसेल तर लगेच नोंदणी करून घ्या.
या अगोदर आपण बघितलेले आहे कि बांधकाम कामगारांना शासनाकडून विविध योजनांचा लाभ दिला जातो. यामध्ये भांडे योजना असेल मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार रुपये त्याचप्रमाणे घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य या आणि याप्रमाणे इतर विविध कल्याणकारी योजनांचा लाभ शासनाकडून देण्यात आला आहे.
आता बांधकाम कामगार मंत्री यांनी बांधकाम कामगारांना निवृत्तीवेतन अर्थात पेन्शन सुरु करणार असल्याची माहिती विधानपरिषदेत दिली आहे.
बांधकाम कामगार कागदपत्रे डाउनलोड करा मोफत pdf मध्ये ओरीजनल
bandhkam kamgar pension yojana किती मिळणार बांधकाम कामगार पेन्शन
बांधकाम कामगारांना किती आणि कशा प्रकारे पेन्शन मिळणार आहे या संदर्भात सखोल माहिती जाणून घेवूयात.
बांधकाम कामगारांना सरसकट पेन्शन मिळणार नसून बांधकाम कामगारांनी नोंदणी करून किती कालावधी झाला आहे यानुसार ते ठरवले जाणार आहे.
बांधकाम कामगारांना जास्तीत जास्त वार्षिक १२ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. या पेन्शनची ३ भागामध्ये विभागणी करण्यात आली आहे. ५० टक्के, ७५ टक्के आणि १०० टक्के.
बांधकाम कामगारांनी १० वर्षे नोंदणी पूर्ण केली असेल तर वार्षिक ५० टक्के पेन्शन मिळेल म्हणजेच ६ हजार रुपये.
नोंदणीस १५ वर्षे पूर्ण झाली असेल तर ७५ टक्के म्हणजेच ९ हजार रुपये प्रती वर्ष पेन्शन मिळणार.
नोंदणीस २० वर्षे पूर्ण झाली असेल तर १०० टक्के म्हणजेच १२ हजार रुपये प्रतिवर्ष याप्रमाणे हे पेन्शन मिळणार आहे.
बांधकाम कामगारांनी नोंदणी करून घ्यावी
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. हा लाभ मिळविण्यासाठी सगळ्यात आधी बांधकाम कामगारांना कामगार म्हणून नोंदणी करावी लागते.
१८ ते ६० वर्षे वयोगटातील पात्र व्यति बांधकाम कामगार योजना अंतर्गत नोंदणी करू शकतात.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येतो.
बांधकाम कामगार नोंदणी कशी करावी या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बांधकाम कामगार नूतनीकरण केले का bandhkam kamgar renewal process
बांधकाम कामगार पेन्शन योजना कामगारांसाठी लाभदायक
असंघटीत बांधकाम कामगारांना या योजनेमुळे खूपच सहाय्यता मिळणार आहे. बांधकाम कामगारांचे जीवन खूपच कष्टदायक असते.
वृद्धपकाळात उत्पन्नाचे स्त्रोत नसल्याने बांधकाम कामगारांना bandhkam kamgar pension yojana पेन्शन योजना खूपच मदतीची ठरणार आहे.
खालील योजनेचा पण लाभ घ्या.
बांधकाम कामगार भांडे योजना 30 प्रकारचे भांडे मिळणारओरीजनल अर्ज डाउनलोड करा