जाणून घेवूयात बांधकाम कामगार भांडे योजना संदर्भात सविस्तर माहिती. ग्रामीण भागामध्ये अनेकजण कामगार असतात त्यांना बांधकाम कामगार योजनेची माहिती नसते.
बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळतो. यापैकी एक योजना म्हणजे बांधकाम कामगारांना मिळणारे भांडे योजना होय.
ज्यांची नोंदणी झाली आहे अशा नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध ३० प्रकारचे भांडे शासनाकडून मोफत मिळतात.
या योजनेसाठी अर्ज कसा करावा, अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावीत. अर्ज कोठे सादर करावा या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकणी दिलेली आहे.
हि माहिती काळजीपूर्वक वाचा जेणे करून तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळू शकेल.
बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना २५०० पासून ते 1 लाखापर्यंत मिळतो लाभ मोबाईलवरून करता येतो अर्ज
कामगार भांडे योजना अर्ज व इतर माहिती
बांधकाम कामगार भांडे योजना संदर्भात केवळ माहिती देवू मदत होणार नाही तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी जो अर्ज करायचा आहे तो कसा करावा लागतो. या संदर्भातील सविस्तर माहिती प्रत्यक्षपणे समजून घेणे गरजेचे आहे.
त्यामुळे या लेखामाध्येच एक व्हिडीओ देखील तुमच्यासाठी देण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये बांधकाम कामगार भांडे योजना लाभ घेण्यासाठी अर्ज कसा सादर करावा या संदर्भातील सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
एवढेच नव्हे तर लेखाच्या शेवटी बांधकाम कामगार भांडे योजना जीआर तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारा अर्ज pdf मध्ये देण्यात आला आहे.
हा अर्ज डाउनलोड करून याची प्रिंट काढून तुम्ही हा अर्ज बांधकाम कार्यालयात सादर करू शकता.
बांधकाम कामगार योजना 2024 मुलांना मिळणार मोफत MS-CIT कोर्स पहा संपूर्ण माहिती असा करा ऑफलाईन अर्ज
शासनाने किती दिले आणि तुम्हाला किती मिळाले खात्री करून घ्या
बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी अर्ज करणे एकदम सोपे आहे. भांडे योजनेसाठी लागणारा अर्जाचा नमुना मी तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहे. या अर्जामध्ये सविस्तर माहिती भरून हा अर्ज तुमच्या जिल्ह्यातील wfc कार्यालयात सादर करून द्या.
भांडे संच घेतांना त्यामध्ये शासनाने जी भांडे दिलेली आहेत ती सर्व तुम्हाला मिळाली आहेत का हे तपासून घ्या.
किती भांडे मिळेल कोणती भांडे मिळेल या संदर्भातील सविस्तर माहितीचा जीआर म्हणजेच शासन निर्णय दिनांक १८ जानेवारी २०२१ रोजी काढण्यात आलेला आहे.
या शासन निर्णयाची म्हणजेच जी आरच लिंक देखील सर्वात शेवटी देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हा जी आर तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता.
तुम्हाला जर भांडी संचामध्ये काही भांडी कमी मिळाली तर त्या संदर्भात दाद मागू शकता.
जी आर व अर्ज डाउनलोड pdf मध्ये डाउनलोड करा
खालील प्रमाणे साहित्य नोंदणीत बांधकाम कामगारांना मिळणार आहे.

इत्यादी वस्तूंचा या संसार बाटलीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
अगदी सविस्तर माहिती या जीआरमध्ये देण्यात आली आहे. शासनाचा हा संपूर्ण जीआर बघण्यासाठी खालील बटनावर क्लिक करून हा जी आर डाउनलोड करा.
तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारा ओरीजनल अर्ज डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करून अर्ज डाउनलोड करून घ्या.
बांधकाम कामगार भांडे योजना कागदपत्रे
बांधकाम कामगार योजना अंतर्गत संसार उपयोगी साहित्य ज्याला ग्रामीण भागामध्ये काही जन संसार बाटली असे देखील म्हणतात तर हे गृहपयोगी साहित्य घेण्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार कार्यालयात हा अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्जासोबत जे कागदपत्रे जोडायची आहेत ती अशी आहेत.
अर्जदाराचा पासपोर्ट फोटो.
अर्जदाराचे बँक पासबुक झेरॉक्स.
अर्ज दाराचे राशन कार्ड झेरॉक्स.
लेबर कार्डची झेरॉक्स.
१ रुपया पेमेंट पावतीची झेरॉक्स.
आधार कार्डची दोन्ही बाजूची झेरॉक्स.
अर्जाचा लाइव डेमो पहा
सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे अक्षरी कितीहीही सांगितले तरी समजण्यास तो थोडे कठीण असते या बाबीचा आम्ही सखोल विचार करून तुमच्यासाठी एक लाइव डेमो तयार केला आहे.
जेणे करून तुम्ही या योजनेचा लाभ घेवू शकाल.
खालील बांधकाम कामगार भांडे योजना संदर्भातील व्हिडीओ पहा आणि त्या पद्धतीने तुमचा अर्ज सादर करून द्या.
वरील व्हिडीओ बघितल्या नंतर आता तुम्हाला कल्पना आली असेलच कि या योजनेसाठी अर्ज कसा करावा लागतो आणि कोणकोणती कागदपत्रे या अर्जासोबत जोडवी लागतात.