बांधकाम कामगारांना जागा खरेदी करण्यासाठी कामगार मंडळाकडून 1 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. पूर्वी हे अनुदान 50 हजार रुपये एवढे होते. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. यामधील एक योजना म्हणजे घरकुल योजना होय. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घरकुल बांधकामासाठी अनुदान देण्यात येते.
परंतु जर बांधकाम कामगारांकडे घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध नसेल तर यासाठी सुद्धा शासन अनुदान देते.
जाणून घेवूयात कशा पद्धतीने शासनाने बांधकाम कामगारांना घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपये अनुदान देवू केले आहे.
खालील योजनेचा पण लाभ घ्या.
बांधकाम कामगार पेटी अर्ज Bandhkam kamgar peti arj
बांधकाम कामगारांना जागा खरेदी करण्यास मिळेल अनुदान
तुम्ही जर नोंदीत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला बांधकाम कामगार मंडळाकडून घरकुल बांधकामासाठी अनुदान दिले जाते.
घर बांधकाम करण्यासाठी ग्रामीण भागातील नोंदीत बांधकाम कामगारांना अटल बांधकाम बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत 1 लाख 50 हजार रुपये अनुदान मिळते.
जागा खरेदीसाठी यापूर्वी 50 हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जात होते, ते आता वाढवून 1 लाख रुपये करण्यात आल्याने घरकुल योजनेसाठी एकूण निधी 2 लाख 50 हजार रुपये एवढा झाला आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्थात बांधकाम कामगार नोंदणी होणे गरजेचे आहे.
खालील योजना पण पहा.
बांधकाम कामगार योजनेचा मोबाईल नंबर असा बदला ऑनलाईन
अशी करा 1 रुपयात बांधकाम कामगार नोंदणी
अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी होणे आवश्यक आहे. जर तुमची बांधकाम कामगार नोंदणी नसेल तर या योजनेचा लाभ घेता येत नाही.
ऑनलाईन पद्धतीने बांधकाम कामगार नोंदणी करता येते. हि नोंदणी अगदी मोबाईलद्वारे देखील करता येते.
बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी 90 दिवसाचे प्रमाणपत्र आवश्यक असते यावर सरकारी कंत्राटदार आणि ग्रामसेवक यांची सही आणि शिक्का आवश्यक असतो.
त्याच बरोबरीने आधार कार्ड, बँक पासबुक, राशन कार्ड इत्यादी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात.
एकदा का तुमची नोंदणी झाली कि मग तुम्ही अटल बांधकाम कामगार आवास योजना प्रमाणे इतर ३२ विविध शासकीय योजनांचा लाभ घेवू शकता.
खालील व्हिडीओ पहा
अटल बांधकाम कामगार योजनेचा जी आर पहा
नोंदणीकृत बांधकाम कामगार यांना घरकुल बांधकाम करण्यासाठी जे अनुदान देण्यात येत आहे त्या संदर्भातील शासन निर्णय तुम्हाला हवा असेल तर खालील बटनावर क्लिक करून हा शासन निर्णय अर्थात जी आर तुम्ही बघू शकता.
घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा खरेदी करण्यासाठी शासनाने १ लाख रुपये अनुदान दिले आहे. या संदर्भातील सविस्तर अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
तर अशा पद्धतीने आता बांधकाम कामगारांना घरबांधकाम करण्यासाठी जागा नसेल तर ती जागा खरेदी करण्यासाठी शासनाकडून 1 लाख रुपये अनुदान मिळणार आहे.