बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी असा करा अर्ज Bandhkam kamgar bhande yojana

जाणून घेवूयात बांधकाम कामगार भांडे योजना संदर्भातील सविस्तर माहिती Bandhkam kamgar bhande yojana.

अनेक ठिकाणी बांधकाम कामगारांना भांडे अर्थात संसारउपयोगी साहित्य मिळत आहे. यामध्ये भांडे संच योजना खूपच लोकप्रिय आहे.

अनेकदा या भांडे योजनेचा लाभ कसा घ्यावा या संदर्भात सामान्य बांधकाम कामगारांना माहिती नसते यामुळे ते अशा योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित असतात.

या ठिकाणी तुम्हाला बांधकाम कामगार भांडे योजना संदर्भातील सविस्तर माहिती मिळेल.

कोणाला मिळेल या योजनेचा लाभ

ज्या बांधकाम कामगारांनी त्यांची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली आहे त्यांना विविध ३२ योजनांचा लाभ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून मिळतो.

तुम्ही जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली असेल आणि तुम्हाला अजूनही भांडे योजनेचा लाभ मिळाला नसेल तर हि माहिती काळजीपूर्वक वाचा.

कामगार यांना पेटी देखील मिळते बांधकाम कामगार पेटी योजना संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील बटनावर क्लिक कर.

बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी अर्ज कसा करावा

कामगारांना विविध प्रकारचे भांडे शासनाकडून मोफत दिले जाते. या संदर्भातील जी आर देखील शासनाकडून निर्गमित करण्यात आला आहे.

भांडे योजनेचा शासनाचा जी आर बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागतो. हा ऑफलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला संदेश येतो एकापेक्षा जास्त बांधकाम कामगारांनी भांडे योजनेसाठी आज केला असेल तर त्या ठिकाणी बांधकाम कामगारांना बोलविले जाते.

त्यांचे आधार बायोमेट्रिक केले जाते. भांडे योजनेचा लाभ घेण्यापूर्वी कामगारांना एक अर्ज लिहून द्यावा लगतो.

हा अर्ज डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

वरील अर्जामध्ये कोणकोणती माहिती भरावी या संदर्भातील सर्व तपशील दिलेले आहेत ते वाचून घ्या.

खरे बांधकाम कामगार कोण आणि लाभ घेत आहे कोण

अनेकदा जे खरोखर बांधकाम कामगार आहेत त्यांना या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता असते कारण त्यांना या योजनांची माहिती होत नाही.

जेंव्हा आपल्या शेजाऱ्याला भांडे मिळतात तेंव्हा मग या योजनेचा लाभ कसा घ्यावा या संदर्भात विचारणा केली जाते.

अनेकजण मिस्त्री यांच्याकडे बांधकाम कामगार म्हणून काम करत असतात परंतु त्यांना माहितच नसते कि शासनाकडून बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळतो.

बांधकाम कामगार योजना अंतर्गत तुम्हाला भांडे योजनाच नव्हे तर इतर ३२ योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर हि योजना कशी आहे ती समजून घ्या.

कसा मिळेल बांधकाम कामगार भांडे योजनेचा लाभ

जे बांधकाम कामगार आहेत त्यांनी एक बाब या ठिकाणी लक्षात घ्यावी कि बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी लगेच किंवा थेट अर्ज करता येत नाही.

भांडे योजनेचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात अगोदर नोंदणी करणे गरजेचे असते. तुम्ही जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली तर तुम्हाला शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळतो आणि यातील एक योजना म्हणजे बांधकाम कामगार भांडे योजना होय.

कशी कराल बांधकाम कामगार नोंदणी

बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो. हा अर्ज बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर करावा लागतो.

या ठिकाणी अर्ज केल्यानंतर तो जर स्वीकारला गेला अर्थात कागदपत्रे अपूर्ण असतील तर अर्ज बाद देखील होऊ शकतो.

अर्ज स्वीकारला गेल्यानंतर १ रुपया पेमेंट करून अर्ज सक्रीय करावा लागतो. अर्ज सक्रीय झाला कि मग तुम्ही बांधकाम कामगार असो किंवा इतर कोणती योजना असो या योजनेसाठी अर्ज करू शकता.

बांधका कामगार योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात हे जाणून घेण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

Leave a Comment