बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जातो. अनेक बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेत आहेत. बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते. नोंदणी केल्यानंतर तुमचा अर्ज जर मंजूर झाला तरच बांधकाम कामगार योजनेच्या विविध योजनांचा लाभ मिळत असतो.
बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने सादर करावा लागतो, कोणकोणते कागदपत्रे आवश्यक असतात या संदर्भात सविस्तर माहिती आम्ही देत आलेलो आहे.
तरीपण काही बांधकाम कामगार सतत विचारणा करत असतात कि आम्ही ऑनलाईन अर्ज सादर केला असूनही आमचा अर्ज मंजूर का होत नाही तर जाणून घेवूयात या संदर्भातील माहिती.
बांधकाम कामगार भांडे योजना 30 प्रकारचे भांडे मिळणारओरीजनल अर्ज डाउनलोड करा
बांधकाम कामगार अर्ज मंजूर सक्रीय करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा
ऑनलाईन अर्ज सादर केल्यावर तुमचा अर्ज जर बांधकाम कामगार विभागाने स्वीकार केले तरी देखील तो अर्ज सक्रीय होत नाही.
याचे महत्वाचे कारण म्हणजे शासनाला तुम्हाला १ रुपया पेमेंट करावे लागते. १ रुपया पेमेंट केल्यानंतरच तुमचा बांधकाम कामगार योजनेचा अर्ज सक्रीय होतो आणि तुम्हाला इतर विविध बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळू शकतो.
अशावेळी तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. प्रोफाईल लॉगीन या बटनावर क्लिक करून अर्जदाराचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका.
मोबाईलवर आलेला otp दिलेल्या चौकटीत टाका आणि login करा.
सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.
१ रुपया पेमेंट केल्यावरच होणार अर्ज सक्रीय
बांधकाम कामगार वेबसाईटवर लॉगीन केल्यानंतर Basic Details या पर्यायामध्ये Application Status Accept असेल आणि Registration status inactive असेल तर तुम्हाला कोणत्याही योजनेसाठी अर्ज सादर करता येणार नाही.
यावर पर्याय काय आहे तर सर्वात शेवटी Payment Details हा पर्याय तुम्हाला शोधायचा आहे. या ठिकाणी पेमेंट करण्याची लिंक तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने १ रुपया पेमेंट करा. यशस्वी पेमेंट केल्यानंतर Application Status आणि Registration status दोन्ही हिरव्या रंगामध्ये Accept दिसत असल्यास तुमचा अर्ज सक्रीय झाला आहे असे समजा.
अर्ज सक्रीय झाल्यावर अर्जदार शासनाच्या विविध योजनांच्या लाभासाठी १ वर्षासाठी अर्ज सादर करू शकतात. १ वर्षानंतर बांधकाम कामगारांना अर्जाचे नूतनीकरण करणे आवश्यक असते.
बांधकाम कामगार वेबसाईट लिंक