बांधकाम कामगार योजना 2025 पेंडिंग अर्ज 31 मार्च पर्यंत मंजूर करा प्रती दिन 150 अर्ज हाताळा मंत्र्याच्या सूचना

बांधकाम कामगार योजना 2025.

बांधकाम कामगार योजना अंतर्गत ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे अशा बांधकाम कामगारांना शासनाकडून विविध योजनांचा लाभ दिला जातो. यासाठी अर्जदाराची बांधकाम कामगार नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे.

नोंदणी करण्यासाठी पूर्वी जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत होते यामध्ये बांधकाम कामगारांचा वेळ आणि पैसे खर्च होत होते.

हि अडचण लक्षात घेवून बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने तालुक्याच्या ठिकाणी कामगार सुविधा केंद्राची निर्मिती करण्यात आली. दिनांक ८ नोव्हेंबर २०२४ पासून हि कामगार सुविधा केंद्रे निर्माण करण्यास सुरुवात करण्यात आली.

आजपर्यंत ३६६ कामगार सुविधा केंद्रे शासनाच्या वतीने सुरु करण्यात आले आहेत.

बांधकाम कामगार भांडे योजना संदर्भातील खालील माहिती पहा.

बांधकाम कामगार भांडे योजना 30 प्रकारचे भांडे मिळणारओरीजनल अर्ज डाउनलोड करा

प्रती दिन हाताळावे लागेल 150 अर्ज शासनाकडून अधिकाऱ्यांना टार्गेट

बांधकाम कामगार सुविधा केंद्र तालुक्याच्या ठिकाणी असल्याने कामगार योजनेची सर्व कामे या ठिकाणी केली जातात.

परंतु बांधकाम कामगार नोंदणी आणि नूतनीकरण करण्यासाठी अनेक बांधकाम कामगार दिवसभर कामगार सुविधा केंद्रासमोर उभी असल्याने या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात गर्दी होतांना दिसत आहे.

बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व इतर बांधकाम कामगार योजना संदर्भातील कामे करण्यासाठी शासनाने बांधकाम कामगार कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रती दिन १५० अर्ज हाताळण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यामुळे आता बांधकाम कामगारांचे नूतनीकरण असो कि नवीन नोंदणी करणे असो हि कामे आता लवकर मार्गी लागणार आहेत.

बांधकाम कामगार पेटी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

बांधकाम कामगार पेटी अर्ज Bandhkam kamgar peti arj 2024

बांधकाम कामगार योजना 2025 कामगार सुविधा केंद्रामध्ये ५ कर्मचारी

यापुढे बांधकाम कामगारांचे कामे जलद गतीने होण्यासाठी आता यापुढे कामगार सुविधा केंद्रामध्ये ५ पैकी तीन कर्मचारी एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करणार आहेत तर उर्वरित दोन कमर्चारी डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करणार आहेत.

यामुळे कामाचा ताण कमी होणार असून बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ घेण्यास मदत मिळणार आहे.

बऱ्याचदा कार्यालयामध्ये कर्मचारी उपलब्ध नसल्याने बांधकाम कामगारांना काम न करताच घरी परतावे लागते. यामध्ये बांधकाम कामगारांची रोजमजुरी तर बुडते शिवाय वेळी वाया जातो.

आता मात्र तालुक्यातील कामगार सुविधा केंद्रामध्ये नियोजन बद्ध आराखडा करण्यात आला असून यामुळे प्रलंबित कामांना गती मिळणार आहे.

उशाराची मिळालेली तारीख करता येणार रद्द

बांधकाम कामगार भांडे योजना असेल किंवा सुरक्षा संच असेल या योजनांचा लाभ घेण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने पडताळणी करावी लागते.

यासाठी उशिराची तारीख एखाद्या कामगाराला मिळाली तर ती तारीख रद्द करून कामगाराच्या सोयीनुसार तारीख निवडता येणार असल्याने आता योजनेचा लाभ घेता येणे अधिक सोपे होणार आहे.

या संदर्भात कामगार मंत्री यांनी अधिकृत माहिती दिलेली आहे. अधिकृत माहितीची लिंक खाली दिली आहे.

अधिकृत माहिती पहा.

बांधकाम कामगार योजना 2025.

Leave a Comment