बांधकाम कामगार योजना 2024 मुलांना मिळणार मोफत MS-CIT कोर्स पहा संपूर्ण माहिती असा करा ऑफलाईन अर्ज

बांधकाम कामगार योजना 2024 Bandhkam kamgar yojana.

आपण बांधकाम कामगाराच्या Bandhkam kamgar yojana 2024 मुलांसाठी मोफत  (MS-CIT) कोर्स बद्दल जाणून घेवूयात संपूर्ण माहिती. तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर MS-CIT साठी शासनाकडून अनुदान मिळते.

आजच्या युगामध्ये तुम्हाला जर संगणकाचे ज्ञान नसेल तर तुम्ही सुशिक्षित असूनही तुमची ओळख निरक्षर म्हणून गणली जाते.

म्हणून तुम्हाला आजच्या युगामध्ये संगणकाचे ज्ञान व माहिती असणे अत्यंत आवश्यक ठरते. बांधकाम कामगारांच्या मुलांना संगणकाचे ज्ञान मोफत मिळावे यासाठी शासनाने हि योजना मोफत सुरू केली आहे.

लाडकी बहिण योजनेच्या अर्जात बदल योजनेतही बदल शासनाचा नवीन जी आर आला.

बऱ्याच बांधकाम कामगाराची आर्थिक परिस्थिती हि कुमकुवत असल्याने बांधकाम कामगार त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांना जर (MS-CIT)  हा कोर्स पूर्ण करायचा असेल तर पालकांना अवघड जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार म्हणून तुमची नोंदणी आवश्यक असते.

बांधकाम कामगार योजना 2024 असा करा MS-CIT कोर्ससाठी अर्ज

तुम्ही नोंदीत बांधकाम कामगार असेल आणि तुमच्या पाल्याला MS-CIT कोर्स मोफत घ्यायचा असेल तुम्हाला यासाठी एक अर्ज सादर करावा लागतो.

ऑनलाईन लाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता.

महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजना या लिंकवर क्लिक करून नंतर बांधकाम कामगारांच्या मुलांना मोफत (MS-CIT)  अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही ऑफलाईन अर्ज सादर करू शकता.

अधिकृत वेबसाईट लिंक

MS-CIT कोर्स मोफत करण्यासाठी ऑफलाईन अर्जामध्ये भरा खालील माहिती

1. अर्जदाराचे संपूर्ण नाव.

2. अर्जदाराचा पासपोर्ट फोटो.

3.  नोंदणी क्रमांक भरणे आवश्यक आहे.

4.  आधार क्रमांक टाकावा.

5.  मोबाईल नंबर.

6.  जन्मदिनांक.

7. वय.

बँकेचे तपशील सादर करा

1. तुमचे ज्या बँकेत खाते असेल त्या बँकेचे नाव.

2.  शाखेचे नाव भरावे.

3.  बँक शाखेचा पत्ता भरणे आवश्यक.

4.  आयएफएस कोड

5. IFSC क्रमांक.

6. बँक खाते क्रमांक.

पाल्याचा तपशील भरा

1. पाल्याचे किंवा पत्नीचे नाव-

2. इयत्ता /अभ्यासक्रम-

3. शाळा /महाविद्यालय/ संस्थेचे नाव टाकने आवश्यक.

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जोडावयाची कागदपत्रे Bandhkam kamgar yojana 2024

. महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची ओळखपत्र.

2.  तुमचे ज्या बँकेमध्ये खाते असेल त्या बँकेच्या पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत.

3. रहिवासी पुरावा आधार कार्ड पारपत्र वाहन चालक ग्रामपंचायत दाखला यापैकी एक.

4.  शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असाल तर पुरावा सादर करण्यासाठी बोनाफाईड/प्रमाणपत्र शाळेचे प्रमाण ओळखपत्र.

अशा पद्धतीने तुम्ही बांधकाम कामगार योजना 2024 योजना अंतर्गत mscit कोर्ससाठी शासनाकडून अनुदान मिळवू शकता.

Leave a Comment