बांधकाम कामगार योजनेचा मोबाईल नंबर असा बदला ऑनलाईन

बांधकाम कामगार मोबाईल नंबर बदल. bandhkam kamgar mobile number change process.

तुम्ही जर बांधकाम कामगार असाल आणि तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलायचा असेल तर त्यासाठी वेगळी लिंक असते.

या लिंकवर जावून हा नंबर बदलता येतो. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये.

तुम्ही जर नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला तुमचा नंबर चेंज कसा करावा या संदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.

नंबर बदलण्यासाठी बांधकाम कामगार विभागाकडून वेगळी लिंक तयार करण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक करून नंबर बदलता येतो.

खालील योजना पण पहा

बांधकाम कामगार पेटीमधील वस्तू किती असते

का बदलावा लागतो बांधकाम कामगार नोंदणीकृत मोबाईल नंबर

बांधकाम कामगार मंडळाच्या वेबसाईटवर लॉगीन करतांना रजिस्टर नंबर सोबत मोबाईल नंबर टाकून लॉगीन करावे लागते. शिवाय मंडळाच्या इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील वेळोवेळी या नंबरवर otp येत असतो.

अशावेळी तुमचा मोबाईल हरविला असेल किंवा सीमकार्ड खराब झाले असेल किंवा कोणत्यातरी कारणास्तव तुम्हाला तुमचा mobile number बदलावा लागत लागला असेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या बांधकाम कामगार योजनेसाठी दिलेला जुन्या मोबाईल नंबर एवजी नवीन नंबर समाविष्ट करू शकता.

नवीन नंबर समाविष्ट करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करावा लागतो. जाणून घेवूयात हि पद्धत कशी आहे.

खालील योजनेचा पण लाभ घ्या.

बांधकाम कामगार पेटी अर्ज Bandhkam kamgar peti arj

बांधकाम कामगार विभागाकडून वेगळी लिंक

तुमची जर तुमच्या रजिस्टर आयडी ने लॉगीन केले ( नेहमी प्रमाणे केले जाणारे लॉगीन) तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती दिसेल जसे कि अर्जदाराचे डीटेल्स, कागदपत्रे, पेमेंट पावती कुटुंबातील सदस्य आणि इतर माहिती.

मोबाईल नंबर बदलण्याची माहिती मात्र या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही. यासाठी वेगळी लिंक bandhkam kamgar विभागाकडून देण्यात आली आहे.

या लिंकवर क्लिक करूनच तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर बदलता येतो.

कसा बदलावा बांधकाम कामगार योजना लिंक मोबाईल नंबर

Bandhkam kamgar mobile number बदलण्यासाठी प्रोसेस खालीलप्रमाणे आहे.

  • तुमच्या मोबाईलमधील किंवा कॉप्युटरमधील ब्राउजरच्या सर्च बारमध्ये https://iwbms.mahabocw.in/change-mobile-number अशा प्रकारचा वेब ॲड्रेस टाकून सर्च करा.
  • एक पेज ओपन होईल त्यामध्ये खालील माहिती सादर करा.

अर्जदाराचे पूर्ण नाव.

आधार नंबर.

राजीष्ट्रेशन नंबर.

जन्म दिनांक.

बँकेचा IFSC.

बँक खाते नंबर.

बँकेचा खाते नंबर कन्फर्म करा.

हि सर्व माहिती सादर केल्यानंतर तुम्हाला Update mobile number या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर अपडेट होईल म्हणजेच जुन्या mobile number एवजी नवीन नंबर तुमच्या bandhkam kamgar अर्जास लिंक होईल.

अशा पद्धतीने तुम्ही Bandhkam kamgar योजनेचा मोबाईल नंबर बदलू शकता.

सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा

Leave a Comment