बांधकाम कामगार नूतनीकरण कसे करावे कोणती कागदपत्रे लागतात जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार विभागाकडून विविध योजनांचा लाभ दिला जातो. या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार विभागाच्या स्थळावर नोंदणी करावी लागते.
एकदा नोंदणी झाली कि एक वर्षभर ती ग्राह्य धरली जाते. प्रत्येक वर्षी बांधकाम कामगारांना नूतनीकरण renewal करावे लागते. बांधकाम कामगारांनी जर त्यांचे वार्षिक नूतनीकरण केले नाही तर त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही.
त्यामुळे आजच्या लेखामध्ये आपण बांधकाम कामगार नूतनीकरण संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
या लेखामध्ये आम्ही बांधकाम कामगारांसाठी एक व्हिडीओ उपलब्ध करून दिलेला आहे. तो व्हिडीओ नक्की बघा.
बांधकाम कामगार कागदपत्रे डाउनलोड करा मोफत pdf मध्ये ओरीजनल
बांधकाम कामगार नूतनीकारणासाठी लागणारी कागदपत्रे
ऑनलाईन बांधकाम कामगार नूतनीकरण करण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे आहे.
१) ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र.
२) बांधकाम कामगार कार्ड.
वरील दोन कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावी लागतात. हि कागदपत्रे तुम्ही तुमच्या तालुक्यातील कामगार सुविधा केंद्रामध्ये जावून अपलोड करू शकता.
सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.
तुम्ही जर नवीन बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला अगोदर नोंदणी करावी लागते.
कामगार सुविधा केंद्रात जावून करावी लागेल नूतनीकरण
पूर्वी कोणतेही व्यक्ती बांधकाम कामगार नूतनीकरण करू शकत असे. आता मात्र तालुक्याच्या ठिकाणी जावून बांधकाम कामगार नवीन नोंदणी किंवा नूतनीकरन करावे लागते.
काही ऑनलाईन सेंटरवर बांधकाम कामगार यांच्याकडून नोंदणी करण्यासाठी किंवा नूतनीकरन करण्यासाठी अधिकचे पैसे घेतल्याचे अनेक उदाहरणे झाल्याने शासनाने आता बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कामगार सुविधा केंद्र सुरु केले आहे.
तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बांधकाम कामगार सुविधा केंद्रामध्ये जावून नवीन बांधकाम कामगार त्यांची नोंदणी करू शकतात.
बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ
तुम्ही जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली तर तुम्हाला विविध योजनांचा लाभ मिळू शकतो.
१) बांधकाम कामगारांना गृहपयोगी भांडे संच.
२) मुलीच्या लग्नासाठी आर्थिक सहाय्य.
३) घरकुल योजनेसाठी ४ लाख रुपये अनुदान.
५) सुरक्षा संच.
६) विमा सुरक्षा.
७) मुलांना शिष्यवृत्ती.
या आणि इतर विविध योजनांचा लाभ बांधकाम कामगारांना मिळतो त्यामुळे तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमची नोंदणी करून घ्या जेणे करून तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळू शकेल.
योजनेच्या सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.