कामगारांना मिळणार 90 दिवसांचे प्रमाणपत्र

बांधकाम कामगारांना मिळणार 90 दिवसांचे प्रमाणपत्र bandhkam kamgar 90 days certificate

बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी 90 दिवसांचे प्रमाणपत्र आवश्यक असते. 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेल्या प्रमाणपत्रावर ग्रामसेवक यांची सही आणि शिक्का आवश्यक असतो.

बांधकाम कामगारांना भांडे, पेटी, मुलांना १ लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती, घरकुल अशा विविध योजनांचा लाभ मिळतो.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार नोंदणी करणे आवश्यक असते आणि हि नोंदणी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे ग्रामसेवक यांच्याकडून मिळणारे 90 दिवसाचे प्रमाणपत्र होय bandhkam kamgar 90 days certificate.

मध्यंतरी ग्रामसेवक बांधकाम कामगारांना सही आणि शिक्के देत नव्हते आता मात्र त्यांना सही आणि शिक्के देण्याबाबत सूचना करण्यात आल्या असल्याने बांधकाम कामगारांना दिलासा मिळालेला आहे.

खालील योजनेचा पण लाभ घ्या.

बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी असा करा अर्ज Bandhkam kamgar bhande yojana

कामगारांना मिळणार 90 दिवसांचे certificate कोणकोणती लागतात कागदपत्रे

बांधकाम कामगास्र योजनेचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात महत्वचे म्हणजे बांधका कामगार नोंदणी करणे होय. हि नोंदणी केल्यानंतर बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळतो. बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाईन देखील करता येते. यासाठी जी कागदपत्रे लागतात ती खालील प्रमाणे आहे.

1) 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र.

2) आधार कार्ड.

3) राशन कार्ड.

4) बँक पासबुक.

5) घोषणापत्र.

खालील योजना पण महत्वाची आहे

बांधकाम कामगार पेटीमधील वस्तू किती असते

90 दिवसाचे प्रमाणपत्र उपलब्ध करण्यास येवू सकते अडचण

इत्यादी कागदपत्रे ऑनलाईन अर्ज करतांना अपलोड करावी लागतात. इतर कागदपत्रे सहजासहजी उपलब्ध होतात यामध्ये प्रामुख्याने 90 दिवसाचे प्रमाणपत्र उपलब्ध करण्यास अडचण येवू शकते.

बांधकाम कामगार 90 दिवस काम केल्याच्या प्रमाणपत्रावर शासकीय कंत्राटदार आणि ग्रामसेवक यांच्या स्वाक्षऱ्या असतात.

मध्यंतरी ग्रामसेवक यावर स्वाक्षरी देत नव्हते आता मात्र यावर स्वाक्षऱ्या देण्याची सूचना लोकप्रतीनिधीकडून करण्यात आली आहे.

कोणती माहिती भरावी लागते या 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर

हे प्रमाणपत्र ग्रामसेवक आणि शासकीय कंत्राटदर देत असल्याने यावर या दोन्हीच्या स्वाक्षऱ्या आणि शिक्के असतात.

ठेकेदाराकडे कोणत्या तारखेपासून ते कोणत्या तारखेपर्यंत बांधकाम कामगार काम करत आहे या संदर्भातील तारीख असते.

ठेकेदाराचे नाव, नोंदणी क्रमांक, ठेकेदाराचे ठिकाण मोबाईल नंबर इत्यादी माहिती या 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर असते bandhkam kamgar 90 days certificate.

त्याचप्रमाणे ग्रामसेवक यांचे नाव मोबाईल नंबर इत्यादी माहिती देखील या प्रमाणपत्रावर असते.

तुम्हाला जर बांधकाम कामगार प्रमाणपत्राचा नमुना बघायचा असेल तर खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हा नमुना डाउनलोड करू शकता.

प्रमाणपत्राचा नमुना डाउनलोड करा.

अशा पद्धतीने बांधकाम कामगारांना मिळणार 90 दिवसांचे प्रमाणपत्र मिळणार असल्याने त्यांना विविध योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे.

Leave a Comment