बांधकाम कामगार सुविधा केंद्रात करावी लागणार बांधकाम कामगारांना नोंदणी.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजना अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यात येतो.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थीस ऑनलाईन अर्ज करता येत होता. आता मात्र हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रोसेस बंद झाली आहे.
यापुढे बांधकाम कामगार नोंदणी किंवा नूतनीकरण करण्यासाठी तालुक्यातील तालुका कामगार सुविधा केंद्रात जावे लागणार आहे.
जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
कोणालाही करता येणार नाही नोंदणी बांधकाम कामगार सुविधा केंद्रात या ठिकाणीच जावे लागेल.
बांधकाम कामगार नोंदणी करायची म्हटल्यास कोणतीही व्यक्ती ऑनलाईन अर्ज सादर करून देत असे. आता मात्र हि सर्व प्रोसेस तालुक्यातील तालुका कामगार सुविधा केंद्रात होत आहे.
या संदर्भातील सूचना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या संकेतस्थळावर दिली आहे.
बांधकाम कामगार योजनेचा अर्ज सादर करण्यासाठी अनेकदा काही ऑनलाईन सेंटरवरून अधिकचे पैसे घेतल्याचा अनेक घटना घडल्या होत्या.
या संदर्भात अनेक तक्रारी देखील करण्यात आल्या होत्या याच बाबीचे गांभीर्य लक्षात घेवून बांधकाम कामगार विभागाने योजनेत मोठा बदल केला आहे.
आता यापुढे बांधकाम कामगार नोंदणी असो किंवा नूतनीकरण यासाठी कामगारांना कोणत्याही एजंटकडे न जाता सरळ तालुक्यातील बांधकाम कामगार सिविधा केंद्रात जावून नोंदणी करावी लागणार आहे.
ऑनलाईन अर्ज व नूतनीकरण बंद करण्याचे कारण
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी काही एजंट किंवा ऑनलाईन सेंटरकडून अधिकचे पैसे घेतल्याच्या अनेक तक्रारी कामगार करतात.
कदाचित याच बाबीचा विचार करून बांधकाम कामगार विभागाने हि ऑनलाईन नोंदणी व नूतनीकरण बंद केले केले असण्याची शक्यता आहे.
बहुतांशी बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी किंवा नूतनीकरणाची पद्धत माहित नसते त्यामुळे अशा बांधकाम कामगारांची आर्थिक पिळवणूक होऊ शकते त्यामुळे बांधकाम कामगार नोंदणी आणि नूतनीकरण करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कामगार सुविधा केंद्रात जावे लागणार आहे.
बांधकाम कामगारांसाठी विविध योजना
बांधकाम कामगार नोंदणी झाल्यानंतर लाभार्थीला विविध योजनांचा लाभ मिळतो. यामध्ये गृहपयोगी साहित्य, घरकुल बांधकाम अनुदान, बांधकाम कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी पैसे हे आणि इतर अजून बऱ्याच योजनांचा लाभ मिळतो.
तुम्ही जर बांधकाम कामगार म्हणून तुमची नोंदणी केली असेल तर या योजनांचा लाभ घेवू शकता.
बांधकाम कामगारांना भांडे योजनेचा लाभ मिळतो या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून माहिती जाणून घ्या.
बांधकाम कामगार भांडे योजना 30 प्रकारचे भांडे मिळणारओरीजनल अर्ज डाउनलोड करा
बाधकाम कामगार योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
- वयाचा पुरावा.
- ९० दिवस म्हणजेच ३ महिने बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र.
- अर्जदाराचा रहिवासी पुरावा.
- पासपोर्ट साईजचे तीन फोटो.
इत्यादी कागदपत्रे नवीन नोंदणी करण्यासाठी आवश्यक असतात. यातील महत्वाचे कागदपत्र म्हणजे ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र होय.
९० दिवस काम केल्याच्या प्रमाणपत्रावर ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवक यांची सही आणि शिक्का लागतो.
नूतनीकरण करण्यासाठी देहील हीच कागदपत्रे लागतात.