बांधकाम कामगार वेबसाईट सुरु bandhkam kamgar diwali bonus 2024
बांधकाम कामगार 5 हजार दिवाळी बोनस संदर्भात सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणत चर्चा सुरु आहे. हे दिवाळी बोनस नोंदीत बांधकाम कामगारांना मिळणार असल्याने आपल्याला हे बोनस मिळेल का आणि यासाठी काय करावे लागेल जणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
आचार साहिंता सुरु असल्याने काल म्हणजेच दिनांक 16 ऑक्टोबर 2024 ला या वेबसाईटवर लॉगीन करता येत नव्हते. आता मात्र हि वेबसाईट सुरळीत सुरु झाली असून बांधकाम कामगारांना आता लॉगीन करता येत आहे.
यामुळे आता तुम्ही तुमचे बँक तपशील ऑनलाईन तपासू शकता जेणे करून तुम्हाला दिवाळी बोनस मिळू शकेल.
खालील माहिती पण महत्वाची आहे.
बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी असा करा अर्ज Bandhkam kamgar bhande yojana
बांधकाम कामगार वेबसाईट सुरु खालील व्हिडीओ पहा
खाली एक व्हिडीओ देण्यात आलेला आहे तो व्हिडीओ पहा जेणे करून तुम्हाला बँक तपशील कसे तपासावे हे लक्षात येईल.
सगळ्यात आधी लक्षात घ्या कि 5 हजार दिवाळी बोनस हे केवळ नोंदीत बांधकाम कामगारांना मिळणार आहे. ज्या बांधकाम कामगारांनी त्यांची नोंदणी केली नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
अशाच प्रकारे ज्यांनी बांधकाम कामगार नोंदणी केली होती परंतु नूतनीकरण केले नाही अशा बांधकाम कामगारांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.
बांधकाम कामगार 5 हजार दिवाळी बोनस मिळविण्यासाठी ऑनलाईन तपासा बँक तपशील
ज्या बांधकाम कामगारांचे खाते सक्रीय आहे अशा नोंदीत बांधकाम कामगारांना त्यांचे बँक तपशील अपडेट करणे गरजेचे आहे अन्यथा त्यांना ५ हजार दिवाळी बोनस 5000 diwali bonus मिळणार नाही.
हे तपशील अगदी मोबाईलवर देखील तपासता येतात कोठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून तुमचे बांधकाम कामगार बँक डीटेल्स बघू शकता.
हे बँक तपशील बघण्यासाठी सगळ्यात अगोदर तुमच्याकडे खालील कागदपत्रे असू द्या.
- आधार कार्ड.
- बँक पासबुक.
- सक्रीय मोबाईल नंबर.
हि कागदपत्रे उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जावून लॉगीन करायचे आहे.
बांधकाम कामगार वेबसाईट सुरु ऑनलाईन बँक अपडेट तपासण्याची पद्धत
बांधकाम कामगार वेबसाईट सुरु बांधकाम कामगारांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.
वेबसाईट ओपन झाल्यावर वेबसाईटची भाषा इंग्रजी करून घ्या. कारण मराठीमध्ये अडचण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Construction worker profile login या पर्यायावर क्लिक करा.
तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून proceed to form या बटनावर क्लिक करा.
त्यानंर तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक otp येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाकून लॉगीन करा.
त्यांतर बँक डिटेल तपासून घ्या यासाठी येथे क्लिक करा.
5000 दिवाळी बोनस संदर्भात अद्याप कोणताही जी आर नाही
बांधकाम कामगारांना सानुग्रह अनुदान म्हणून ५ हजार रुपये देण्याची घोषणा बांधकाम मंत्री सुरेश खाडे यांनी जरी केली असली तरी या संदर्भात अद्याप कुठलाही जी आर आलेला नाही.
मागच्या वेळेस देखील तत्कालीन बांधकाम मंत्री हनीफ मुश्रीम यांनी बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस जाहीर केला होता प्रत्यक्षात मात्र अनेक कामगारांना हा बोनस मिळालाच नाही.
यावेळी देखील असे होऊ नये अशी अपेक्षा आहे. बांधकाम कामगारांनी देखील दिवाळी बोनस संदर्भात सविस्तर माहिती घ्यावी कारण दिवाळी बोनस या बाबीचा फायदा घेवून अनेक लोक तुमच्याकडून पैसे उगाळू शकतात त्यामुळे अशा एजंटच्या लोभस बळी पडू नये.
बऱ्याच वेळेस निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारच्या घोषणा केल्या जातात मात्र त्या पूर्ण न झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसत असतो.
त्यामुळे सध्या तरी बांधकाम कामगार विभागाकडून दिवाळी बोनस bandhkam kamgar diwali bonus 2024 संदर्भात फक्त घोषणा करण्यात आलेली आहे जी आर मात्र काढण्यात आलेला नाही हि बाब या ठिकाणी लक्षात घ्यावी.