बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड bandhkam kamgar smart card मिळविण्याची पद्धत जाणून घेण्याआधी समजावून घेवूयात या कार्डचे फायदे काय आहेत. सध्या आदर्श आचार सहिंता सुरु असल्याने या योजनांसाठी अर्ज करता येत नाही परंतु निवडणूक झाल्यावर अशाच पद्धतीने तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
तुमच्याकडे जर हे बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड असेल तर तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण विभागाकडून मिळणाऱ्या विविध योज्नानांचा लाभ दिला जातो. यामध्ये मग संसारोपयोगी साहित्य, सुरक्षा संच, मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार रुपये, घरकुल योजना अनुदान या व इतर अजूनही योजनांचा लाभ मिळतो.
त्यामुळे तुमच्याकडे जर हे बांधकाम कामगार कार्ड असेल तर नक्कीच तुम्हाला देखील शासनाच्या या विविध योजनांचा लाभ मिळून आर्थिक सहाय्य मिळू शकते.
तुम्हाला बांधकाम कामगार कार्ड कसे असते याचा नमुना बघायचा असेल तर खालील बटनावर क्लिक करून बांधकाम कामगार कार्ड डाउनलोड करून घ्या आणि बघा कि बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड कसे असते.
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी काय करावे लागेल.
सगळ्यात आधी लक्षात घ्या कि ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे त्यांनाच हे महत्वाचे कार्ड मिळते. आता तुम्हाला जर प्रश्न पडला असेल कि बांधकाम कामगार नोंदणी कशी करावी तर त्या संदर्भात देखील आपण या लेखामध्ये थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
ज्या व्यक्तीने ९० दिवस बांधकाम काम केलेले आहे ती व्यक्ती स्वतःची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करू शकते. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावून हि नोंदणी करावी लागते.
नोंदणी करण्यासाठी खालील कागदपत्रे लागतात.
१) ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र.
२) आधार कार्ड.
३) स्वयंघोषणापत्र.
४) बँक डीटेल्स टाकण्यासाठी बँक पासबुक.
खालील योजनेचा पण लाभ घ्या.
बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी असा करा अर्ज Bandhkam kamgar bhande yojana
असे मिळते कार्ड
वरील कागदपत्रांपैकी ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र मिळविणे सध्या खूपच अवघड झाले आहे. कारण यावर ग्रामसेवक सही आणि शिक्का देण्यास टाळाटाळ करत आहेत.
वरील सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज सादर करावा लागतो. अर्ज मंजूर झाला कि मग १ रुपया पेमेंट करून अर्ज सक्रीय करता येतो.
तुमचा बांधकाम कामगार अर्ज सक्रीय झाल्यावर काही महिन्याच्या आत तुम्हाला हे बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड bandhkam kamgar smart card मिळते.
एकतर बांधकाम कार्यालय येथून तुम्हाला हे कार्ड घेवून जाण्यासाठी फोन येवू शकतो किंवा तुमच्या पत्त्यावर हे कार्ड पाठविले जाते.
बांधकाम कामगारांना जागा खरेदी करण्यासाठी मिळणार 1 लाख रुपये
कामगार कार्ड असण्याचे फायदे
तुमच्याकडे जर बांधकाम कामगार कार्ड असेल तर तुम्ही नोंदीत बांधकाम कामगार असल्याचा तो सगळ्यात मोठा पुरावा असतो. जेंव्हा बांधकाम कामगार अर्ज नूतनीकरण करावा लागतो त्यावेळी देखील या कार्डची छायांकित प्रत नूतनीकरणाच्या अर्जासोबत जोडावी लागते.
बांधकाम कामगार कार्ड असेल तर विविध योजनांचा लाभ मिळतो.
किचन सेट.
बांधकाम कामगारांना घरकुल योजना.
कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती.
विमा योजना.
मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार रुपये अनुदान.
बांधकाम कामगार यांचा अपघाती मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य.
कामगाराच्या पत्नीच्या प्रसुतीसाठी आर्थिक सहाय्य.
या आणि इतर योजनांचा लाभ तुमच्याकडे बांधकाम कामगार कार्ड असेल तर मिळतो.
सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.