बांधकाम कामगार योजना मंजूर करण्यासाठी कोणत्याही दलालांना पैसे देवू नये

बांधकाम कामगार योजना नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जातो. अर्थातच बांधकाम कामगारांना या योजनेची सविस्तर माहिती नसण्याची शक्यता असल्याने अनेक दलाल त्यांचा गैरफायदा घेतांना दिसत आहेत.

बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळवू देतो म्हणून अनेक दलाल सद्या सक्रीय झालेले आहेत. अशावेळी कोणत्याही खाजगी व्यक्तींना बांधकाम कामगार योजनेसाठी पैसे दिले तर कामगारांची फसवणूक होऊ शकते.

तुम्ही जर नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला शासनाच्या विविध ३२ योजनांचा लाभ मिळू शकतो. सर्वसामान्य कामगारांसाठी कोणकोणत्या योजना आहेत या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेवूयात.

बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा मिळू शकतो लाभ.

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना ज्या योजना मिळतात त्या खालीलप्रमाणे आहेत.

बांधकाम कामगारांना घरकुल योजना.

मुलांना शिष्यवृत्ती.

मुलीच्या लग्नासाठी आर्थिक सहाय्य.

गृहोपयोगी वस्तू.

बांधकाम कामगार किंवा त्याची पत्नी जर आजारी पडली तर त्यासाठी आर्थिक सहाय्य.

वरील योजना व्यतिरिक्त देखील अजून बऱ्याच योजनांचा लाभ नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिला जातो. त्यामुळे सध्या अशा योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी काहीजण कामगारांकडून पैसे घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Contact us

स्वतः करा अर्ज.

तुमची जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झाली असेल तर तुम्ही स्वतः या योजनांसाठी अर्ज करू शकता. स्वतः अर्ज कसा करावा या संदर्भात या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती देण्यात येईल.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा नोंदणीक्रमांक आणि मोबाईलवर आलेला पासवर्ड टाकून तुम्ही लॉगीन करू शकता.

एकदा का लॉगीन झालात कि मग कोणत्याही योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता. प्रोसेस अगदी सोपी आहे. बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यसाठी सगळ्यात आधी बांधकाम कामगार नोंदणी करणे गरजेचे असते.

बांधकाम कामगार नोंदणी आता केवळ १ रुपयात केली जाते. या व्यतिरिक्त कोणताही खर्च येत नाही.

केवळ एका रुपयात केली जाते बांधकाम कामगार नोंदणी

तुम्ही जर थोडी माहिती घेतली तर अगदी एका रुपयामध्ये तुम्ही तुमची बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करू शकता. हि नोंदणी कशी करावी या संदर्भात सविस्तर माहितीचा व्हिडीओ पहा.

वरील व्हिडीओ काळजीपूर्वक पहा आणि त्या पद्धतीने तुमची कामगार नोंदणी करून घ्या. हीच नोंदणी तुम्ही बाहेर एजंटद्वारे केली तर तुम्हाला ५०० ते २००० रुपयांपर्यंत खर्च एवू शकतो.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

एकदा का तुमची बांधकाम कामगार म्हणून नोदणी झाली कि मग तुम्ही शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवू शकता.

Leave a Comment