बांधकाम कामगार पेटी अर्ज Bandhkam kamgar peti arj

पहा कसा करावा लागतो बांधकाम कामगार पेटी अर्ज Bandhkam kamgar peti arj

नोंदणीत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकरी मंडळाकडून पेटी ज्याला सुरक्षा संच safety kit असे म्हणतात ती दिली जाते.

बांधकाम कामगार सुरक्षा संच safety kit मिळविण्यासाठी अर्जदाराला अर्ज करावा लागतो.

हा अर्ज कसा असतो कोठून डाउनलोड करायचा कोणती माहिती त्यामध्ये सादर करावी लागते. तुम्ही किंवा तुमच्या मित्रपरिवारातील कोणी बांधकाम करत असेल तर हि माहिती त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे.

खालील योजनेचा पण लाभ घ्या.

बांधकाम कामगार भांडे योजना 30 प्रकारचे भांडे मिळणारओरीजनल अर्ज डाउनलोड करा

बांधकाम कामगार पेटी अर्ज अशी करा नोंदणी

कामगार पेटी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराची बांधकाम कामगार नोंदणी होणे गरजेचे आहे. नोंदणी झाली नसेल तर तुम्हाला या पेटी योजनेचा safety kit योजनेचा लाभ मिळणार नाही.

बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कशी करावी या संदर्भात जर तुम्हाला माहित हवी असेल तर अगदी १ रुपयांमध्ये तुम्ही तुमची बांधकाम कामगार नोदंनी करू शकता.

हि प्रोसेस अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.

एकदा का तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झाली कि मग तुम्हाला बांधकाम कामगाराच्या विविध योजनांचा लाभ दिला जातो.

योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक अर्ज सादर करावा लागतो तो खालीलप्रमाणे आहे.

बांधकाम कामगार पेटी अर्ज डाउनलोड करा

बांधकाम कामगार योजना पेटी अर्ज अर्थात सुरक्षा संच safety kit योजनेचा pdf अर्ज खालील लिंकवर डाउनलोड करून त्यामध्ये सविस्तर माहिती सादर करून द्या.

मोबाईलमध्ये अर्ज डाउनलोड करत असाल तर डाउनलोड झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या. आणि तुमच्या जिल्ह्यातील wfc कार्यालयात सादर करून द्या.

बांधकाम कामगार कागदपत्रे डाउनलोड करा मोफत pdf मध्ये ओरीजनल

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

अर्ज डाउनलोड केला प्रिंट देखील काढली परंतु केवळ अर्ज सादर करून काही फायदा होणार नाही. अर्जासोबत काही कागदपत्रे जोडावी लागतात ती खालील प्रमाणे आहे.

१ बांधकाम कामगार नोंदणी केल्याची पावती.

कामगार नुतनीकरण केल्याची पावती.

कामगार कल्याण मंडळाचे ओळखपत्राची झेरॉक्स.

आधारकार्डची झेरॉक्स.

इत्यादी कागदपत्रे अर्जदाराला पेटी अर्ज safety kit application सोबत बांधकाम कामगार कार्यालयात सादर करावी लागणार आहेत.

बांधकाम कामगार पेटी वस्तू

कोणते साहित्य मिळते बांधकाम कामगार पेटीमध्ये

बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या पेटीमध्ये खालील साहित्य मिळते.

सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

पाठीवर अडकवली जाणारी बॅग.

जॅकेट.

सुरक्षेसाठी हेल्मेट.

जेवण नेण्यासाठी ४ कप्प्यांचा डबा.

काळ्या रंगाचे बूट.

सोलरवर चालणारे टॉर्च.

सोलरवरील चार्जर.

पाणी पिण्यासाठी लागणारी बॉटल.

चटई ( mat )

मच्छरदाणी जाळी.

इमारतीवर काम करतांना लटकण्यासाठी लागणारा बेल्ट.

हातमोजे ( Hand Gloves ).

इत्यादी वस्तू या बांधकाम कामगार पेटीमध्ये असतात. तुम्ही जर नोंदीत बांधकाम कामगार असाल तर या योजनेच नक्की लाभ घ्या.

Leave a Comment