झेरॉक्स मशीन अनुदान योजना सुरु 43 हजार रुपये मिळेल अनुदान अर्ज उपलब्ध डाउनलोड करा

जाणून घेवूयात झेरॉक्स मशीन अनुदान योजना संदर्भात सविस्तर माहिती.

जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर अंतर्गत झेरॉक्स मशीन योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. झेरॉक्स मशीन शासकीय अनुदानावर घ्यायची असेल तर त्यासाठी पंचायत समिती येथे अर्ज करावा लागणार आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.

तुम्ही बेरोजगार असाल आणि तुम्हाला स्वतः व्यवसाय सुरु करायचा असेल आणि त्यासाठी झेरॉक्स मशीनची आवश्यकता असेल तर दिनांक १५ जुलै २०२३ पर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकता.

झेरॉक्स मशीनसाठी लागणारा pdf अर्ज तुम्हाला या लेकाच्या सर्व शेवटी मिळेल.

झेरॉक्स मशीन अनुदान मिळविण्यासाठी कसा कराल अर्ज

मागासवर्गीय महिलांना हि झेरॉक्स मशीन मशीन अनुदानावर मिळणार असून यासाठी ४३०७० रुपये एवढे अनुदान मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या २० टक्के उपकारांतर्गत मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन दिले जाणार आहे.

तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. झेरॉक्स मशीन अनुदान मिळविण्यासाठी पात्र लाभार्थी महिलांना विहित नमुन्यातील अर्ज संबधित समाज कल्याण विभागाच्या पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करावा लागणार आहे.

अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

वरील लिंकवर क्लिक करून झेरॉक्स मशीन अनुदान अर्ज डाउनलोड करून घ्या. अर्ज सादर करतांना या अर्जासोबत काही कागदपत्रे देखील जोडावी लागणार आहेत.

पिको फॉल शिलाई मशीनसाठी देखील अर्ज सुरु झालेले आहेत या योजनेचा देखील तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर खालील लिंकवर क्लिक करा.

अर्जासोबत जोडावी लागणारी कागदपत्रे

अर्जदाराच्या जागेबाबत ग्रामसेवक यांचा जागेचा दाखला.

अर्जदाराचा जातीचा दाखला.

१ लाख रुपयांपर्यतचा तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला.

दारिद्ररेषेचा दाखला.

ग्रामसेवक यांचे रहिवासी प्रमाणपत्र.

अर्जदाराने यापूर्वी लाभ घेतला नसल्याचे प्रमाणपत्र.

योजनेसाठी इतर आवश्यक कागदपत्रे

अर्जदाराच्या घरातील सदस्य शासकीय सेवेत नसल्याचे प्रमाणपत्र.

ग्राम सभेच्या ठरावाची प्रत.

अर्जदाराच्या आधारकार्डची झेरॉक्स प्रत.

राष्ट्रीयकृत बँक खाते पुस्तकाची झेरोक्स प्रत.

झेरॉक्स व्यवसाय सरू करण्यासाठी विद्युत पुरवठा असल्याबाबतचा ग्रामसेवक यांचा दाखला.

जागेचा नमुना नंबर ८ अ.

इत्यादी कागदपत्रे अर्ज करतांना मुख्य अर्जासोबत जोडावी लागणार आहेत.

अशा पद्धतीने तुम्ही झेरोक्स मशीन अनुदान मिळविण्यासाठी अर्ज करू शकता.

Leave a Comment