भूमीहीनांना मिळेल ४ एकर जमीन पहा सविस्तर माहिती.
ग्रामीण भागामध्ये सद्य अनेक मजूर असे आहेत ज्यांच्याकडे स्वतः शेती नाही. यामुळे त्यांना इतरांच्या शेतामध्ये रोजमजुरी करावी लागते.
अनेकांना वाटते कि आपली स्वतःची शेती असावी परंतु शेती घेणे खूपच महाग असल्याने अनेक शेतमजूर इच्छा असूनही शेती खरेदी करू शकत नाही.
अशावेळी तुम्ही जर शासकीय योजनेचा लाभ घेतला तर तुम्हाला स्वतः शेती मिळू शकते. शेती घेण्यासाठी शासन अनुदान देते यासाठी मात्र तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज कसा करावा कोठे करावा या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे हि माहिती संपूर्ण वाचा जेणे करून तुम्हाला शासकीय योजनेचा लाभ मिळू शकेल.
खालील योजना पण पहा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा pdf अर्ज उपलब्ध डाउनलोड करा या तारखेला मिळेल 1500 रुपये
भूमीहीनांना मिळेल ४ एकर कोणत्या व्यक्ती आहेत पात्र
कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजनेच्या अंतर्गत भूमिहीन शेत मजुरांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.
या योजेंचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय किमान १८ व कमाल ६० वर्षे असावे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागामध्ये अर्ज करता येणार आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध या घटकातील लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. तुम्ही जर ओपन कॅटेगरीतील असाल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळू शकत नाही.
किती मिळेल जमीन
कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजने अंतर्गत लाभार्थ्यांना चार एकर जिरायत म्हणजेच कोरडवाहू व २ एकर बागायती म्हणजे ओलिताखालील जमीन मिळणार आहे.
या योजनेसाठी १०० टक्के अनुदान दिले जाते. तुम्ही देखील या योजनेसाठी पात्र असाल तर या योजनेचा लाभ घेवू शकता.
भूमीहीन शेत मजुरांना जर शासकीय अनुदानावर जमीन मिळाली तर त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे या योजनेचा पात्र लाभार्थींनी लाभ घेवून स्वतः प्रगती करावी.
कोठे करावा अर्ज
प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचे कार्यालय असते. अशा ठिकाणी पात्र लाभार्थी कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजनेचा अर्ज करू शकतात.
अर्जाचा नमुना आणि इतर सविस्तर माहिती देखील तुम्हाला त्याच ठिकाणी मिळू शकते.
भूमीहीनांना मिळेल ४ एकर योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.
ती कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.
योजनेसाठी लागणारा विहित नमुन्यातील अर्ज.
जातीचे प्रमाणपत्र.
भूमिहीन प्रमाणपत्र.
आधार कार्ड.
रेशन कार्ड.
रहिवासी दाखला.
वार्षिक उत्पन्नाचा तहसीलदार यांचा दाखला.
वयाचा पुरावा.
दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र.
कसा मिळेल योजनेचा लाभ
ज्यास ठिकाणी जमीन उपलब्ध होईल त्या परिसरात राहणाऱ्या पात्र दारिद्र्यरेषेखालील भूमीहीन अनुसूचित जाती व नवबौद्ध लाभार्थ्याच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखालील समिती लाभार्थ्याची निवडची प्रक्रिया पूर्ण करेल.
अशा पद्धतीने भूमीहीनांना मिळेल ४ एकर जमीन पात्र लाभार्थ्यांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतून जमीन शासकीय अनुदानावर दिली जाते.
या संदर्भातील जीर बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.