बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना Bandhkam kamgar shidhyavrutti yojana
ज्यांची बांधकाम कामगार नोंदणी झाली आहे अशा नोंदीत कामगारांना महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाकडून शासकीय अनुदान मिळते.
बांधकाम कामगारांच्या पाल्यांना २५०० पासून १ लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळते. शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी जो अर्ज आहे तो मोबाईलवर सुद्धा करता येतो.
हे अनुदान मिळविण्यासाठी काय प्रोसेस आहे ते आपण या लेखामध्ये समजावून घेवूयात. या लेखाच्या सर्वात शेवटी एक व्हिडीओ देखील देण्यात आला आहे जेणे करून तुम्हाला अर्ज भरण्यास कोणतीही अडचण येवू नये.
बांधकाम कामगार योजना मंजूर करण्यासाठी कोणत्याही दलालांना पैसे देवू नये
बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना पाल्यांना मिळू शकतो शिष्यवृत्ती योजनेचा लाभ
ग्रामीण भागात अनेक असे नागरिक आहेत जे बांधकाम कामगार म्हणून काम तर करतात परंतु त्यांची नोंदणी होत नाही.
नोंदणी न झाल्यामुळे बांधकाम कामगार विभागाकडून मिळत असलेल्या योजनांचा त्यांना लाभ मिळत नाही. त्यामुळे तुम्ही जर बांधकाम कामगार असाल आणि तुम्हाल शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तो कसा घ्यावा लागतो या संदर्भात सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना लागणारी कागदपत्रे
बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मोबाईलवर भरण्यास सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या मोबाइलमध्ये खालील कागदपत्रे स्कॅन करून ठेवा.
मार्कशीट.
बोनाफाईड प्रमाणपत्र.
कॉलेजचे ओळखपत्र.
राशन कार्ड.
पाल्याचे मतदान कार्ड.
वरील सर्व कागदपत्रे तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या.
बांधकाम कामगार योजना 2024 मुलांना मिळणार मोफत MS-CIT कोर्स पहा संपूर्ण माहिती असा करा ऑफलाईन अर्ज
बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना अर्ज
तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउजर ओपन करा.
ब्राउजरच्या सर्च बारमध्ये BANDHKAM KAMGAR असा शब्द टाकून सर्च करा.
CONSTRUCTION WORKER अशी लिंक येईल त्यावर टच करा.
या ठिकाणी तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची वेबसाईट ओपन होईल.
पेजला थोडे खाली स्क्रोल करा.
APPLY ONLINE FOR CLAIM या बटनावर क्लिक करा.
SELECT ACTION या बटनावर क्लिक करताच या ठिकाणी दोन पर्याय येईल एक म्हणजे New Claim व Update Claim.
New Claim या बटनावर टच करा.
अर्जदाराचा बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाका आणि proceed to form या बटनावर टच करा.
तुमच्या मोबाईलवर आलेला otp दिलेल्या चौकटीत टाका आणि Validate otp या बटनावर टच करा.
अर्ज करण्यास सुरुवात करा
आता अर्जदाराचा संपूर्ण अर्ज या ठिकाणी ओपन होईल. पेजला थोडे खाली स्क्रोल करा.
योजना श्रेणी निवडा या चौकटीवर टच करा.
शैक्षणिक कल्याण योजना हा पर्याय निवडा.
आता या ठिकणी विविध पर्याय तुम्हाला दिसेल तुमचा पाल्याचे जे शिक्षण असेल ते या पर्यायामधून निवडा.
१० वी पाससाठी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करत आहोत त्यामुळे आपण या पर्यायामधून नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता १० वी व बारावीमध्ये ५० टक्के किंवा अधिक गुण मिळाल्यास रु. १० हजार या ऑप्शनवर टच करा.
कशी निवडाल तारीख
अर्ज भरला कागदपत्रे अपलोड केलीत आता कामगार सुविधा केंद्राला तुम्हाला भेट द्यायची आहे. यासाठी त्यांची appointment घ्यावी लागते. त्यासाठी या ठिकाणी अर्जदाराला दिनांक निवडायचा आहे.
अनेकजण बांधकाम कामगार योजना अंतर्गत शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करत असतात अशावेळी या सर्व अर्जदारांना एकदाच सुविधा केंद्रामध्ये बोलविणे शक्य होत नसल्याने अर्जदारांना वेगवेगळ्या तारखा देण्यात येतात.
तुमची तारीख तुम्हाला या ठिकाणाहून बुक करायची आहे.
तारीख निवडतांना 3 कलर तुम्हाला दिसेल.
पिवळा कलर असा दर्शवितो कोटा पूर्ण आहे म्हणजेच ज्या तारखेचा रंग पिवळा आहे ती तारीख अगोदरच बुक झालेली आहे.
लाल कलर ज्या तारखेला असेल त्या दिवशी शासकीय सुट्टी आहे.
मात्र हिरव्या कलरची तारीख तुम्ही निवडू शकता.
कशी निवडाल तुमची तारीख
दिनांक या चौकटीवर टच करा.
जी तारीख खाली असेल ती निवडा.
या ठिकाणी आपण १४ ऑगस्ट हि तारीख निवडलेली आहे.
या ठिकाणी एक प्रतिज्ञापत्र आहे ते वाचून घ्या. सर्वात शेवटी सबमिट या बटनावर टच करा.
अशा प्रकारे तुमचा अर्ज सादर झाला असून अर्जाची पोच पावती देखील मिळाली आहे. ओके या बटनावर टच करा.
हि प्रोसेस समजण्यास तुम्हाला अवघड जात असेल तर खालील व्हिडीओ पहा आणि त्या प्रमाणे शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करून द्या.
शिष्यवृत्ती लाभ मिळविण्यासाठी Appointment Letter प्रिंट करून घ्या.
प्रिंट Appointment Letter या बटनावर टच करा.
हे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता कि बांधकाम कामगार विभागाच्या वतीने अर्जदाराच्या नावे हे पत्र आले असून मूळ कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या पत्राची प्रिंट काढून घ्या आणि ज्या दिवशी तुम्हाला संबधित कार्यालयात जायचे आहे त्या दिवशी हे पत्र सोबत असू द्या.
अशा पद्धतीने तुम्ही बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना अंतर्गत शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी मोबाईलवर अर्ज सादर करू शकता.