अत्यावश्यक संच Essential Kit योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु आहेत. तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर लगेच तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करून द्या. यामध्ये बांधकाम कामगारांना १० वस्तू मोफत मिळणार आहे.
ऑनलाईन अर्ज लिंक उपलब्ध झालेली आहे. लगेच तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करून द्या. एकदा का अत्यावश्यक संच योजनेचा लक्षांक पूर्ण झाला कि मग तुम्हाला अर्ज सादर करता येणार नाही त्यामुळे विनाविलंब तुमचा अर्ज सादर करून द्या.
अत्यावश्यक संच (Essential Kit) या योजना अंतर्गत १० वस्तू मिळतात. या योजनेचा जी आर देखील या लेखाच्या सर्वात शेवटी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
पुढील योजनेचा पण लाभ घ्या बांधकाम कामगार भांडी वाटप योजना 2025 – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, पात्रता व संपूर्ण माहिती
योजनेचा जीआर पहा त्याप्रमाणे वस्तू मिळाल्याची खात्री करा
बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच (Essential Kit) मिळाल्यानंतर त्यामध्ये जीआर प्रमाणे वस्तू उपलब्ध असल्याची खात्री करून घ्या.
जीआरमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष वस्तू मिळाल्या नाही तर तुम्ही संबधित अधिकारी साहेबांकडे तक्रार करूस शकतात त्यामुळे जी आर तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.
त्यामुळे हा अत्यावश्यक संच (Essential Kit) जी आर तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळेस बांधकाम कामगारांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सगळी माहिती असणे आवश्यक आहे.
पुढील माहिती पण कामाची आहे बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड
योजनेची थोडक्यात माहिती
योजनेची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे आहे.
| योजनेचे नाव. | अत्यावश्यक संच Essential Kit |
| कोण करू शकतात अर्ज. | ज्यांची बांधकाम कामगार नोंदणी सक्रीय आहेत असे अर्जदार |
| कोठे करावा अर्ज. | अर्ज लिंक |
| किती मिळेल वस्तू | १० वस्तू मिळेल. |
| योजनेचा जी आर आहे का? | होय, जी आर लिंक |
दोन्ही वेगवेगळ्या योजना
एक बाब या ठिकाणी बांधकाम कामगारांनी लक्षात घ्यावी कि बांधकाम कामगार गृहपयोग वस्तू संच योजना ज्याला अनेकजन भांडे योजना असे म्हणतात तर हि योजना आणि अत्यावश्यक संच (Essential Kit) हि योजना पुर्णपणे वेगवेगळ्या आहेत.
गृहपयोगी संच योजना अंतर्गत ३० प्रकारचे भांडे मिळतात. या योजनेसाठी देखील ऑनलाईन अर्ज सुरु आहेत. या योजनेची लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून अर्ज करू शकता.
गृहपयोगी संच योजना ऑनलाईन अर्ज लिंक
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदणीकृत पात्र बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. यामध्ये अनेक योजना आहेत यामधील एक योजना म्हणजे होय.
या योजनेमध्ये खालीलप्रमाणे वस्तू मिळतात
- पत्र्याची पेटी (Galvanized Trunk)
- प्लास्टिकची चटई (Plastic Mat)
- धान्य साठवण कोठी (क्षमता २५ किलो) (Grain Storage Tank – 25 Kg)
- धान्य साठवण कोठी (क्षमता २२ किलो) (Grain Storage Tank – 22 Kg)
- बेडशीट (Bedsheet)
- चादर (Chaddar)
- ब्लँकेट (Blanket)
- साखर ठेवण्यासाठीचा डबा (क्षमता १ किलो) (एसएस २०२) (Sugar Container – 1 Kg – SS 202)
- चहा पावडर ठेवण्यासाठीचा डबा (क्षमता ५०० ग्रॅम) (एसएस २०२) (Tea Container – 500 gram – SS 202)
- वॉटर प्युरिफायर (१८ लिटर) (SS 202) (दोन कँडलसह) (Water Purifier – 18 ltr – SS 202 with 2 Candle)
ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ (MAHABOCW) तर्फे राबवली जाणारी योजना आहे.
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना या योजनेअंतर्गत १० अत्यावश्यक वस्तूंचा संच मोफत दिला जातो.
महाराष्ट्रातील MAHABOCW कडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना.
अर्जदाराचे वय १८ ते ६० वर्षे दरम्यान असावे आणि मागील १२ महिन्यांत किमान ९० दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे.
एकूण १० वस्तू मिळतात:
पत्र्याची पेटी
प्लास्टिक चटई
धान्य साठवण कोठी (२५ किलो)
धान्य साठवण कोठी (२२ किलो)
बेडशीट
चादर
ब्लँकेट
साखर डबा (१ किलो, SS 202)
चहा पावडर डबा (५०० ग्रॅम, SS 202)
वॉटर प्युरिफायर (१८ लिटर, २ कँडलसह)
योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडून एक लिंक देण्यात आली आहे. त्या लिंकवर क्लिक करून अर्ज करावा.
दोन्ही योजना स्वतंत्र आहेत:
अत्यावश्यक संच – १० वस्तू
गृहपयोगी संच (भांडे योजना) – ३० भांडी
अर्जाची निश्चित तारीख नसली तरी लक्ष्यांक पूर्ण झाल्यावर अर्ज बंद होतात, त्यामुळे लवकर अर्ज करणे योग्य.