जाणून घेवूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना mukhyamantri mazi ladki bahin yojana दिनांक १ जुलै २०२४ पासून सुरु झाली आहे. या योजना अंतर्गत पात्र महिलांना महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत.
या योजनेसाठी अर्ज कसा करावा लागणार आहे कोठे करावा लागणार आहे कागदपत्रे कोणती आहेत कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र नसणार आहे हि आणि इतर महत्वाची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे हि संपूर्ण माहिती वाचून घ्या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा जी आर शासनाने निर्गमित केला असून हि योजना कशा पद्धतीने राबविली जाणार आहे या संदर्भात यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
ज्या महिलांचे वय २१ ते ६० वयोगटातील आहेत अशा महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये शासन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे.
बांधकाम कामगार योजना मंजूर करण्यासाठी कोणत्याही दलालांना पैसे देवू नये
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी कोणत्या महिला असणार आहेत पात्र
लाभार्थी महिला हि महाराष्ट्र रहिवासी असली पाहिजे
विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
कुटुंब प्रमुखांचे वार्षिक उत्पन्नहे 2.50 लाखापेक्षा कमी असावे.
लाभार्थी महिलेचे वय ६० पेक्षा जास्त असेल तर अशी महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे.
झेरॉक्स मशीन अनुदान योजना सुरु 43 हजार रुपये मिळेल अनुदान अर्ज उपलब्ध डाउनलोड करा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी कोठे करावा लागणार अर्ज
मुख्यमंत्री माझी बहिण योजनेचा mukhyamantri majhi bahin yojana लाभ घेयासाठी सेतू सुविधा केंद्रामध्ये ऑनलाईन अर्ज करता येईल. अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
तुम्हाला जर ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका किंवा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तुम्हाला या मुख्यमंत्री माझी बहिण योजनेचा अर्ज सादर करता येईल.
ऑफलाईन अर्जाचा नमुना खालील बटनावर क्लिक करून डाउनलोड करून घ्या.
कागदपत्रे कोणते लागेल
लाभार्थी महिलेचे आधारकार्ड छायांकित प्रत.
रेशनकार्डची छायांकित प्रत.
सक्षम अधिकाऱ्याने दिलेला २.५० रुपयांपेक्षा कमी असलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला.
लाभार्थी महिलेचा रहिवासी दाखला.
बँक पासबुक.
लाभार्थी महिलेचा फोटो.
कधी मिळेल पैसे
शासनाने काढलेल्या जीआर नुसार लाभार्थींना १ ते १५ जुलै २०२४ पर्यंत अर्ज करायचे आहेत.
जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची १६ जुलै २०२४ ला तात्पुरती यादी प्रकाशित होईल.
या यादीवर तुम्ही पाच दिवसाच्या आत हरकती नोंदवू शकता.
ज्या हरकती येतील त्या हरकतींचे निवारण करण्याचा कालावधी २१ ते ३० जुलै असणार आहे.
१ ऑगस्ट २०२४ रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची अंतिम यादी प्रकाशित केली जाईल.
१० ऑगस्ट रोजी पात्र लाभार्थ्यांची ekyc केली जाईल.
सर्वात शेवटी १४ ऑगस्टला पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची १५०० रुपये रक्कम जमा केली जाईल.
प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला हि रक्कम महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.