पिको फॉल शिलाई मशीन अर्ज सुरु 9300 मिळणार अनुदान अर्जाचा नमुना pdf मध्ये डाउनलोड करा pico fall shilai machine

पिको फॉल शिलाई मशीन pico fall shilai machine अर्ज सुरु झाले असून अर्जाचा नमुना pdf मध्ये तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. बेरोजगार कामगारांना होईल फायदा.

ग्रामीण भागामध्ये अनेक महिला कामगार अशा आहेत ज्यांना शिलाई मशीन घेवून काम करण्याची इच्छा असते. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्या घेवू शकत नाहीत. तुम्ही जर बेरोजगार असाल आणि तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर लवकर अर्ज करून द्या कारण आता शासकीय अनुदानावर पिको फॉल शिलाई मशीन मिळणार आहे.

बांधकाम कामगार योजना मंजूर करण्यासाठी कोणत्याही दलालांना पैसे देवू नये

या लेखामध्ये शिलाई मशीनसाठी अर्ज कसा करावा, कोठे करावा अर्जाची शेवटची तारीख कोणती आहे योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात या संदर्भात सविस्तर माहित देण्यात आली आहे त्यामुळे हि संपूर्ण माहिती वाचा.

जिल्हा परिषद २० टक्के उपकारांतर्गत मागासवर्गीय महिलांना पिको फॉल शिलाई मशीन या योजनेचा लाभ दिला जातो. pico fall shilai machine subsidy 9300  एवढे अनुदान दिले जाते. यासाठी अर्ज कसा करायचा या संदर्भात जाणून घेवूयात सविस्तर माहिती.

पिको फॉल शिलाई मशीन अर्ज नमुना डाउनलोड करा

या योजनेसाठी विविध जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरु असतात परंतु सध्या संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने या पिको फॉल शिलाई मशीनसाठी अर्ज मागविले आहेत.

तुमच्या जिल्ह्यामध्ये हि योजना जेंव्हा सुरु होईल तेंव्हा तुम्हाला दिलेल्या पात्रतेच्या निकषावर लाभ मिळू शकतो.

तुम्ही जर संभाजी नगर जिल्ह्यातील रहिवासी असाल आणि मागासवर्गीय महिला असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा नमुना देखील या ठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

खालील बटनावर क्लिक करून पिको फॉल शिलाई मशीन अर्ज pdf नमुना डाउनलोड करून घ्या shilai machine application.

वरील बटनावर क्लिक करून अर्जाचा नमुना डाउनलोड करा. अर्जात विचारलेली माहिती काळजीपूर्वक भरा आणि अर्ज सादर करून द्या.

झेरॉक्स मशीनचा अर्ज डाउनलोड करायचा असेल तर खालील बटनावर क्लिक करून अर्ज डाउनलोड करून घ्या झेरॉक्स मशीनसाठी ४३ हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

कोणत्या योजनेतून मिळेल लाभ आणि कोठे करावा लागेल अर्ज सादर

सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषद २० टक्के उपकारांतर्गत हि योजना राबविली जाते. या योजना अंतर्गत ९३०० एवढे अनुदान दिले जाते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्जामध्ये व्यवस्थित माहिती सादर करून तो गट विकास अधिकारी पंचायत समिती यांच्या कार्यालयात सादर करावा लागणार आहे.

अर्जाचा नमुना वरती दिला आहे तो डाउनलोड करून घ्या. या अर्जामध्ये अजून ५ प्रमाणपत्र आहेत ते देखील अर्जदारास सादर करावे लागणार आहे.

पिको फॉल शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी जोडावे लागतील आणखी ५ प्रमाणपत्रे

योजनेचा लाभ घेण्यासाठी जे ५ प्रमाणपत्र आहेत ते खालीलप्रमाणे आहेत.

गट विकास अधिकारी पंचायत समिती यांचे शिफारसपत्र.

योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र.

कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय सेवेत कार्यरत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.

योजनेसाठी गरजू किंवा पात्र असल्या बाबतचे ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र.

अर्जदार शिवणकाम करत असल्याबाबतचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र.

इत्यादी प्रमाणपत्र संबधित अधिकारी यांच्याकडून घेवून पिको फॉल शिलाई मशीनच्या मुख्य अर्जासोबत अर्जदारास जोडावे लागणार आहेत.

योजनेसाठी लागणारी इतर कागदपत्रे

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारास अजून काही कागदपत्रे लागणार आहेत ती खालीलप्रमाणे आहेत.

शिवणकाम करत असल्याबाबतचा दाखला.

जातीचा दाखला.

तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला एक लाख रुपयापर्यंतचा.

दारिद्र्यरेषेखाली असल्याचा दाखला.

ग्रामसेवक यांनी दिलेली रहिवासी दाखला किंवा स्वयंघोषणापत्र.

यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतला नसल्याचा ग्रामसेवकांनी दिलेला दाखला.

कुटुंबातील सदस्य शासकीय सेवेत नसल्याबाबतचे ग्रामसेवकाने दिलेले स्वयंघोषणापत्र.

ग्रामसभेतील योजनेचा लाभ देणेबाबत घेण्यात आलेल्या ठरावाची नक्कल प्रत.

आधार कार्डची प्रत.

राष्ट्रीयकृत बँक खाते पुस्तकाची प्रत.

लाभधारक गरजू व पात्र असल्या बाबतचा संबंधित ग्रामसेवक यांचा दाखला.

इत्यादी कागदपत्रे अर्जदारास योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणार आहेत.

Leave a Comment