बांधकाम कामगार भांडी वाटप योजना 2025 – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, पात्रता व संपूर्ण माहिती

बांधकाम कामगारांना भांडी वाटप योजना अंतर्गत भांडे मिळत आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा लगतो जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.

बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांचे जीवन नेहमीच स्थलांतराशी जोडलेले असते.

एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना त्यांना राहणीमान व जेवणाच्या सोयींचा मोठा प्रश्न निर्माण होतो. या अडचणींवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने गृहपयोगी संच योजना म्हणजेच भांडी वाटप योजना सुरू केली आहे.

भांडी वाटप योजना मध्यंतरी बंद झाली होती आता मात्र नव्याने या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे.

पुढील योजना पण पहा बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड

भांडी वाटप योजना संदर्भात थोडक्यात माहिती

बांधकाम कामगार भांडी वाटप योजना ही महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत राबविण्यात येणारी एक महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना ३० भांड्यांचा संपूर्ण संच शासनाकडून मोफत उपलब्ध करून दिला जातो.

या संचामध्ये घरगुती वापरासाठी लागणारी सर्व आवश्यक भांडी समाविष्ट असतात.

या संदर्भात दिनांक १८ जानेवारी २०२१ रोजी शासनाने जी आर काढून कोणकोणते भांडे बांधकाम कामगारास मिळणार आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती देलेली आहे.

बांधकाम कामगार भांडे योजनेचा जीआर बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

योजनेचा उद्देश

बांधकाम कामगारांना भांडी देण्यामागे शासनाचा खालील उद्देश आहे.

  • स्थलांतरित बांधकाम कामगारांच्या अडचणी कमी करणे
  • जेवण बनवण्यासाठी आवश्यक भांडी उपलब्ध करून देणे
  • कामगारांच्या कुटुंबाला आधार मिळवून देणे
  • सामाजिक व आर्थिक सुरक्षा प्रदान करणे

बांधकाम कामगार भांडी वाटप योजना 2025 चे वैशिष्ट्ये

  1. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांना ३० भांड्यांचा संच मोफत दिला जातो.
  2. भांडी योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार म्हणून नोदंनी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी आता कोणतेही शुल्क लागत नाही.
  3. सर्व अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच सादर करावे लागतात.
  4. नोंदणी करण्यासाठी ९० बांधकाम कामगार म्हणून काम केले असावे.
  5. भांडी योजना संदर्भात 2021 च्या शासन निर्णयानुसार सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत.

भांडी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

बांधकाम कामगार नोंदणी केल्यानंतर केवळ भांडी योजनाच नव्हे तर इतरही योजनांचा लाभ मिळतो. नोंदणी करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतात.

  • बांधकाम कामगार नोंदणी कार्ड.
  • आधार कार्ड.
  • मोबाईल नंबर.
  • नोंदणी व नूतनीकरण दिनांक.
  • ९० दिवस बांधका कामगार म्हणून काम केल्याचे संबधित अधिकारी यांचे प्रमाणपत्र.
  • घोषणा पत्र.
  • बँक पासबुक
  • फोटो.

पुढील योजनेचा पण लाभ घ्या भांडी योजना ऑनलाईन अर्ज

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या टिप्स

  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातात.
  • सर्व माहिती योग्य व अचूक भरावी.
  • नोंदणी आणि नूतनीकरण वैध आहे का हे तपासून मगच अर्ज करावा.
  • वेळेत अर्ज न केल्यास लाभ मिळू शकत नाही.

योजनेचे फायदे

  • बांधकाम कामगार कुटुंबाला घरगुती भांड्यांचा मोफत संच उपलब्ध.
  • वारंवार स्थलांतर करताना भांड्यांचा मोठा खर्च वाचतो.
  • शासनाकडून मिळणाऱ्या या योजनेमुळे कामगारांचे आर्थिक ओझे कमी होते.
  • कामगारांच्या जीवनमानात सुधारणा घडते.

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया (Online Application Process)

भांडे योजना 2025 साठी अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतात – योजनेच्या सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

  1. नोंदणी: प्रथम बांधकाम कामगार म्हणून मंडळात ऑनलाईन नोंदणी करावी लागते.
  2. लॉगिन: महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करावे.
  3. Appointment Form: गृहपयोगी संच योजना / भांडे योजना निवडावी.
  4. फॉर्म भरणे: अर्जदाराचे नाव, नोंदणी क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, नूतनीकरण दिनांक इत्यादी माहिती भरावी.
  5. कॅम्प निवड: ज्या ठिकाणी अर्जदार भांडे संच घेऊ इच्छितो तो कॅम्प निवडावा.
  6. सबमिट: अर्ज सबमिट करून acknowledgment slip डाउनलोड करावी.

लेखाचा सारांश

बांधकाम कामगार भांडी वाटप योजना 2025 ही एक महत्वाची कल्याणकारी योजना आहे. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने मोफत गृहपयोगी संच उपलब्ध करून दिला आहे. पात्र बांधकाम कामगारांनी वेळेत ऑनलाईन appointment सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

बांधकाम कामगार भांडी वाटप योजना म्हणजे काय?

ही योजना महाराष्ट्र शासनाकडून राबविली जाते. यामध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मोफत ३० भांड्यांचा संच दिला जातो.

भांडी वाटप योजनेसाठी कोण पात्र आहे?

महाराष्ट्रातील नोंदणीकृत व नूतनीकरण केलेले बांधकाम कामगार या योजनेसाठी पात्र असतात.

भांडी योजनेसाठी अर्ज कसा करावा?

अर्ज फक्त ऑनलाईन appointment फॉर्मद्वारे करावा लागतो. नोंदणी क्रमांक, आधार, मोबाईल नंबर, नूतनीकरण दिनांक इत्यादी माहिती आवश्यक असते.

भांडी वाटप योजनेचा ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी किती खर्च येतो.

बांधकाम कामगारांना भांडी वाटप योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणताही खर्च येत नाही. हि प्रक्रिया अगदी निशुल्क आहे.

Leave a Comment