बांधकाम कामगार किचन सेट (भांडी योजना) 2025 – Online अर्ज लिंक, पात्रता आणि पूर्ण माहिती | Bhandhkam Kamgar Kitchen Set

बांधकाम कामगार किचनसेट अर्ज अजूनही आहेत भांडी योजनेचा लाभ घेण्यासाठी मोबाईलवरून करा अर्ज.

बांधकाम कामगार किचनसेट अर्ज लिंक अद्यापहि सुरु आहे. तुम्ही जर अजूनही ऑनलाईन अर्ज सादर केला नसेल तर तुमचा अर्ज करून द्या कारण हि लिंक कोणत्याही क्षणी बंद पडू शकते.

मागे देखील बांधकाम कामगार भांडी योजनेची ऑनलाईन लिंक सुरु झाली होती परंतु ती मध्येच बंद झाल्याने अनेकांना अर्ज करता आले नाही परिणामी त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही.

कामगारांना गृहपयोगी संच ज्याला किचन सेट देखील अनेक जन म्हणतात मिळत आहे. या बांधकाम कामगार किचन सेटमध्ये ३० प्रकारची विविध भांडी असतात जी कि बांधकाम कामगारांना मोफत उपलब्ध करून दिली जातात.

तुम्ही जर नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला सुद्धा किचन सेट मिळू शकतो.

यासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागते. हि प्रोसेस कशी आहे ते आपण या ठिकाणी समजवून घेणार आहोत.

पुढील माहिती पण कामाची आहे भांडे योजनेची ऑनलाईन लिंक पुन्हा सुरु — बांधकाम कामगारांसाठी मोठी संधी

किचन सेट ऑनलाईन अर्ज लिंक आणि प्रोसेस

बांधकाम कामगारांना किचन सेट Bhandhkam kamgar kitchen set अर्थात भांडी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घावी लागते.

यामध्ये कोणकोणती माहिती भरावी लागते या संदर्भातील महत्वपूर्ण माहितीचा खाली दिलेला आहे तो बघा आणि त्याप्रमाणे किचन सेटसाठी व्हिडीओ या लेखाच्या सर्वात शेवटी देण्यात आला आहे.

तो व्हिडीओ पहा आणि त्याप्रमाणे तुमचा ऑनलाईन अपॉइंटमेंट घेवून टाका.

बांधकाम कामगार योजनांची माहिती असू द्या.

बांधकाम कामगारांना कामासाठी वेगवेगळय ठिकाणी स्थलांतरीत व्हावे लागते या बाबीचा विचार करून शासन अशा बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबवीत असते.

या योजनांची माहिती अनेकदा अशा बांधकाम कामगारांना नसल्याने ते अशा योजनांच्या लाभापासून वंचित असतात.

अनेकदा बांधकाम कामगार योजनांचा लाभ मिळवून देतो म्हणून मध्यस्थांच्यावतीने देखील फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे बांधकाम बांधकाम कामगार योजनांची माहिती करून घ्या जेणे करून तुम्हाला कोणत्याही एजंटची गरज पडणार नाही.

बांधकाम कामगार किचन सेट अर्थात भांडी योजनेचा जी आर पहा

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किती भांडे दिले जातात या संदर्भातील शासन निर्णय दिनांक १८ जानेवारी २०२१ रोजी काढण्यात आलेला आहे.

या जी आरमध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे कि किचनसेट बॉक्समध्ये परती, पेले, वरगळे, मोठ्या परती, पाण्याचा पिंप या संदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे.

त्यामुळे ज्यावेळी बांधकाम कामगारांना भांडे संच दिला जातो त्या वेळी एवढे साहित्य त्या बॉक्समध्ये आहे का या संदर्भात खात्री करून घ्या.

या व्यतिरिक्त अजूनही बांधकाम कामगार योजना भांडे योजना संदर्भात माहिती हवी असेल तर bhande yojana digital dg असा कीवर्ड टाकून नेहमी तुमची आमच्या वेबसाईटला भेट देवू शकता.

भांडी योजनेची ऑनलाईन अर्ज लिंक सुरु आहे का?

होय सध्यातरी बांधकाम कामगार भांडी योजनेच्या ऑनलाईन अपॉइंटमेंटची लिंक सुरु आहे. हि लिंक कधीही बंद होऊ शकते त्यामुळे तुम्ही जर नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर लगेच तुमची ऑनलाईन नोंदणी करून द्या.

ऑनलाईन अर्ज केल्यावर किती दिवसात मिळतात भांडी.

बांधकाम कामगारांना अपॉइंटमेंट लेटरवर एक तारीख दिली जाते. त्यादिवशी ठराविक कॅम्पमध्ये जावून बायोमेट्रिक पडताळणी केली जाते आणि त्यानंतर भांडी योजनेचा लाभ दिला जातो.

भांडी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या व्यक्ती पात्र आहेत?

ज्या कामगारांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केली आहे ते भांडे योजनेसाठी पात्र लाभार्थी असतात.

नवीन नोंदणी करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात?

भांडे योजनेसाठी नवीन नोंदणी नसते मात्र बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगार म्हणून नोंदणी सक्रिय असणे आवश्यक असते.

Leave a Comment