अनेकदा बांधकाम कामगारांना माहित नसते की अर्ज केल्यानंतर किती दिवसांत बांधकाम कामगार भांडे संच मिळतो. काही वेळा अर्ज करूनही भांडे संच मिळत नाही. त्यामुळे या योजनेबद्दलची सविस्तर माहिती खाली दिली आहे.
बांधकाम कामगार भांडे योजना संदर्भात अनेक कामगारांना माहिती नसण्याची शक्यता असते यामुळे अनेक कामगार पात्र असूनही या योजनेच्या लाभापासून वंचित असतात.
तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर हि माहिती तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे.
पुढील माहिती पण वाचा कामगार भांडे योजना अर्ज
बांधकाम कामगार भांडे संच कोण आहेत पात्र लाभार्थी?
बांधकाम कामगार भांडे योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे ऑनलाईन नोंदणी असणे आवश्यक आहे.
- ज्यांची नोंदणी झाली आहे, त्यांना ऑनलाईन पद्धतीने भांडे योजनेचा तसेच इतर योजनांचा लाभ घेता येतो.
- नोंदणी नसलेल्या बांधकाम कामगारांनी प्रथम ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी, जेणेकरून मंडळाच्या सर्व योजनांचा लाभ घेता येईल.
अर्ज केल्यापासून किती दिवसांनी भांडे योजनेचा लाभ मिळतो?
गृहपयोगी संचासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतल्यानंतर खालीलप्रमाणे प्रक्रिया होते 👇
- ऑनलाईन अपॉइंटमेंट घेणे.
- अर्जदाराला एक ठराविक दिनांक दिला जातो. त्या दिवशी पत्रात नमूद केलेल्या ठिकाणी जाऊन बायोमेट्रिक पडताळणी करावी लागते.
- पडताळणी झाल्यानंतर त्याच दिवशी भांडे संच देण्यात येतो.
- संच मिळाल्यानंतर बांधकाम कामगाराकडून त्याबाबतची लिखित नोंद घेण्यात येते.
पुढील योजनेचा पण लाभ घ्या बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड Bandhkam kamgar smart card मिळविण्याची पद्ध
ज्या दिवशी बायोमेट्रिक पडताळणी होईल, त्याच दिवशी भांडे घेवून जा
- बांधकाम कामगारांना ज्या दिवशी पडताळणीसाठी बोलावले जाते, त्या दिवशीच भांडे संच देणे अनिवार्य आहे.
- जर पडताळणी झाल्यानंतर बांधकाम कामगार भांडे संच न दिल्यास, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होऊ शकते.
- त्यामुळे पडताळणी पूर्ण होताच भांडे संच घ्या.
- जर संच मिळाला नाही, तर पत्रातील दिलेल्या नंबरवर संपर्क साधा.
सध्या भांडे वितरण पद्धत पूर्वीपेक्षा अधिक पारदर्शक आणि कडक करण्यात आली आहे.
बांधकाम कामगार भांडे योजना ऑनलाईन अर्ज लिंक
कोणालाही अधिक पैसे देण्याची गरज नाही
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिक पैसे देण्याची काहीच आवश्यकता नाही.
- कोणी पैसे मागितले तर त्याची तक्रार त्वरित अधिकाऱ्यांकडे करा.
- भांडे योजनेसाठी अपॉइंटमेंट मोबाईलवरून सहज करता येते.
बांधकाम कामगार भांडे संच अपॉइंटमेंटसाठी अर्ज मोबाईलवरून कसा करावा यावरील सविस्तर मार्गदर्शनासाठी खालील व्हिडिओ जरूर पहा.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी झालेला कोणताही सक्रीय बांधकाम कामगार या योजनेसाठी पात्र असतो. नोंदणी नसल्यास प्रथम ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी.
ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतल्यानंतर दिलेल्या दिवशी बायोमेट्रिक पडताळणी केल्यावर त्याच दिवशी भांडे संच देण्यात येतो.
बांधकाम कामगार ओळखपत्र
आधारकार्ड
अपॉइंटमेंट लेटर / नोंदणी प्रमाणपत्र
अपॉइंटमेंट लेटरमध्ये नमूद केलेल्या ठिकाणी उपस्थित राहून बायोमेट्रिक पडताळणी करावी लागते. तेथेच भांडे संच मिळतो.
जर पडताळणी करूनही भांडे संच मिळाला नाही, तर अपॉइंटमेंट लेटरवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते.
भांडे योजनेची अपॉइंटमेंट मोबाईलवरून ऑनलाईन घेता येते. अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करून अर्ज केल्यानंतर अपॉइंटमेंट दिनांक दिला जातो.