शिष्यवृत्तीसाठी लागणारी कागदपत्रे या संदर्भात आपण या लेखामध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे अशा नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने शिष्यवृत्ती दिली जाते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो.
हा अर्ज केल्यानंतर appointment Letter मिळते, यामध्ये दिलेल्या तारखेला बांधकाम कामगारांना उपस्थित मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे लागते.
पुढील योजनेचा पण लाभ घ्या सुरक्षा संच ऑनलाईन अर्ज सुरु
कोणत्या वर्गातील विद्यार्थांना किती मिळते शिष्यवृत्ती
नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा पाली कोणत्या वर्गात शिकत आहे त्यानुसार हि शिष्यवृत्ती दिली जाते.
- 1 ली ते 7 वीतील विद्यार्थ्यांना 2500 रुपये मिळतात.
- इयत्ता 8 वी ते 10 वी – 5000 रुपये.
- 10 वी ते 12 वी – 10,000 रुपये पण मार्क 50 टक्के पेक्षा जास्त पाहिजे रुपये.
- 1 st year, second year and 3rd – 20 हजार रुपये अनुदान रुपये.
- Diploma – 20000 रुपये.
- Degree – 25000 रुपये.
- Medical degree – 1 लाख रुपये.
- engineering – 60,000 रुपये.
कसा आणि कोठे करावा अर्ज
सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे बांधकाम कामगार शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज कसा आणि कोठे करावा या संदर्भात अजुनी बऱ्याच बांधकाम कामगारांना माहिती नाही.
यामुळे अशा बांधकाम कामगारांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बांधकाम कामगार शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज अगदी मोबाईलद्वारे देखील करता येतो. अर्ज करण्यासाठी कोणतेही लायसेन्स किंवा विशेष आयडी आवश्यक नसते.
खालील व्हिडीओ पहा आणि त्यानुसार तुमच्या पाल्याचा ऑनलाईन अर्ज सादर करून द्या.
पुढील योजनेचा पण लाभ घ्या भांडे योजनेची ऑनलाईन लिंक पुन्हा सुरु — बांधकाम कामगार मोबाईलवरून अर्ज करताना
सुविधा केंद्रात जावून करावी लागेल कागदपत्रांची पडताळणी
शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर एक Appointment print मिळते ती घेवून त्यावर दिलेल्या दिनांकाच्या दिवशी बांधकाम कामगारांना तालुक्यातील सुविधा केंद्रामध्ये कागदपत्रे पडताळणीसाठी जावे लागते.
कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहतांना ऑनलाईन अर्ज सादर करतांना जी कागदपत्रे सादर केली तीच कागदपत्रे सोबत असू द्यावीत. शिष्यवृत्तीसाठी लागणारी कागदपत्रे.
- Appointment print
- आधार कार्ड.
- राशनकार्ड
हि व इतर महत्वाची कागदपत्रे सोबत असू द्या जेणे करून तुमचा अर्ज रद्द होणार नाही. तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल आणि तुम्हाला देखील या शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा असेल तर अशा पद्धतीने अर्ज सादर करुंद द्या.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लगतो.
सर्वसाधारणपाने पाल्य ज्या इयत्तेत शिकत आहे त्या संदर्भातील ओळखपत्र, बोनाफाईड सर्टिफिकेट, उपस्थिती प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतात.
पाल्य कोणत्या इयत्तेत शिकत आहे यावर हे अनुदान अवलंबून असते.
बांधकाम कामगार योजनेच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटची अशी ठराविक तारीख नसते. पाल्य शिकत असेल तर कोणत्याही वेळी अर्ज सादर करता येतो.