बनावट बांधकाम कामगारांची चौकशी होणार असून यामध्ये जे दलाल आहेत त्यांच्यावर सुद्धा मोठी कारवाई होणार असल्याची माहिती बांधकाम कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने नोंदीत बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. यामुळे जे बांधकाम कामगार नाहीत त्यांनी देखील खोटे कागदपत्रे तयार करून या योजनेचा लाभ घेतला असल्याच्या अनेक तक्रारी बांधकाम कामगार विभागाकडे आल्याने बांधकाम कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी हा निर्णय घेतला आहे.
बांधकाम कामगार योजनेत लाभ मिळवून देण्यासाठी अनेक दलाल सक्रीय झाले असल्याने खऱ्या बांधकाम कामगारांना या योजेनेपासून वंचित राहावे लागत आहे.
बांधकाम कामगार योजनेत दलालांचा सहभाग आदळला तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती बांधकाम कामगार मंत्र्यांनी दिली आहे.
योजनेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी
बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळतो यामध्ये प्रामुख्याने खालील योजनांचा समावेश आहे.
- भांडे योजना.
- सुरक्षा कीट.
- मुलीच्या लग्नासाठी ५० हजार रुपये अनुदान.
- मुलांसाठी शिष्यवृत्ती.
- घरकुल योजना.
अशा अनेक प्रकारच्या योजना आहेत. यामधील भांडे योजना व सुरक्षा कीट वाटपामध्ये गैरप्रकार झाल्याच्या लोकप्रतिनिधी तसेच बांधकाम कामगारांकडून तक्रारी आलेल्या आहेत. अनेक ठिकाणी बांधकाम कामगारांचे बायोमेट्रिक घेतल्यानंतरही त्यांना भांडे मिळालेले नाहीत.
नोंदणी करण्यासाठी केवळ १ रुपया आवश्यक दलाल कामगारांकडून १ ते २ हजार रुपये घेतात. सुरक्षा कीटचे देखील असेच आहेया अनुषंगाने बांधकाम कामगार मंत्र्यांनी जिल्हास्थारावर दक्षता पथक नेमण्याचे आदेश संबधितांना दिलेले आहेत.
जिल्हास्थरावर स्थापन केले जाणार दक्षता पथक
बांधकाम कामगार योजनेतील गैर प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हा स्थरावर दक्षता पथके स्थापन केले जाणार आहे. या दक्षता पथकांचे कार्यक्षेत्र मात्र दुसऱ्या जिल्ह्यात असणार आहे जेणे करून तपासणीमध्ये पारदर्शकता येईल.
प्रत्येक दक्षता पथकाला एक जिल्हा नेमून दिला जाणार आहे. हे पथक प्रामुख्याने खाली बाबींची चौकशी करेल.
- बांधकाम कामगाराची नोंदणी खरी आहे कि खोटी आहे. नोंदणी करण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केलेली आहेत का?
- नोंदणी करण्यासाठी कोणी अधिकच्या पैशांची मागणी केली आहे का?
- योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटे दावे दाखल केले आहेत का?
वरील बाबींवर दक्षता पथक लक्ष केंद्रित करून हि तपासणी मोहीम राबविणार आहे. या तपासणीमध्ये बांधकाम कामगार दलाल आढळून आले तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
बनावट बांधकाम कामगारांची चौकशी अहवाल करावा लागेल सादर
दक्षता पथकाला दर महिन्याला मंडळास त्यांचा तपसणी अहवाल सादर करावा लागणार आहे. यामुळे बांधकाम कामगार योजनेतील दलाल व बनावट बांधकाम कामगारांवर आळा बसण्यास मदत होईल.
ग्रामीण भागामध्ये दलाल मोठ्या प्रमाणावर बांधकाम कामगारांकडून अधिकचे पैसे घेत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. बांधकाम कामगारांना योजनेची माहिती नसल्याने त्यांची फसवणूक अगदी सहजपणे केली जाते.
या फसवणुकीला आळा घालण्यासाठी अशा प्रकारची मोहीम राबविणे हि काळजी गरज होती. आता फक्त जी दक्षता पथके तपासणी करणार आहेत त्यांनी ती निपक्षपणे करणे गरजेचे आहे जेणे करून बांधकाम कामगार योजनेला दलाल रुपी लागलेल्या किडीचा नायनाट करता येईल.
या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा.
थोडक्यात समजून घ्या बांधकाम कामगार योजना
बांधकाम कामगार योजनेचा सारांश थोडक्यात खालीलप्रमाणे आहे जेणे करून हि योजना समजण्यास लाभार्थीला सोपे जाईल.
योजनेचे नाव. | बांधकाम कामगार योजना. |
योजना राबविणाऱ्या मंडळाचे नाव. | महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक | अधिकृत वेबसाईट लिंक |
लाभार्थी पात्रता | अर्जदार कामगार असला पाहिजे |
योजनेसाठी लागणारी प्रमुख कागदपत्रे | ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र. आधार कार्ड. फोटो. बँक पासबुक. हमीपत्र. इत्यादी. |
बनावट बांधकाम कामगारांची चौकशी व दलालांचा सुळसुळाट थांबला तर नक्कीच खरोखरच्या बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळेल.