कामगारांचे दिवाळी बोनस जमा करण्यासंदर्भात आंदोलन

कामगारांचे दिवाळी बोनस जमा करण्या संदर्भात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे जाणून घेवूयात या संदर्भातील माहिती.

नोंदणीत बांधकाम कामगारांना ५ हजार रुपये दिवाळी बोनस दिला जाणार असल्याची माहिती तत्कालीन बांधकाम मंत्री सुरेश खाडे यांनी दिली होती.

बांधकाम कामगारांना अद्यापही दिवाळी बोनस मिळालेले नसल्याने अनेक ठिकाणी आता आंदोलन करून हे बोनस लवकरात लवकर बांधकाम कामगारांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावे या संदर्भात आंदोलन करण्यात आले आहे.

नोंदणीत बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जातो. यामध्ये अनेक योजना आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

सध्या मात्र ऑनलाईन अर्ज सुरु नसून हे अर्ज लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी विविध बांधकाम कामगार संघटना तसेच बांधकाम कामगारांकडून केली जात आहे.

कामगारांचे दिवाळी बोनस जमा कधी होणार

विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन बांधकाम कामगार मंत्री यांनी बांधकाम कामगारांना ५ हजार रुपये दिवाळी बोनस देण्याचे जाहीर केले होते.

परंतु अद्यापहि काही बांधकाम कामगारांना हे दिवाळी बोनस मिळालेले नसल्याने हे दिवाळी बोनस कधी मिळेल याकडे बांधकाम कामगारांचे लक्ष लागले आहे.

बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस लवकरात लवकर बँक खात्यात जमा करावे या मागणीसह कामगार नोंदणीचे अधिकार केंद्रीय कामगार संघटनांना द्या या संदर्भात कामगार संघटनांनी आंदोलन सुरु केले आहे.

दिवाळी बोनस संदर्भात मंत्र्यांनी दिलेली माहिती पहा.

कामगारांना 5000 दिवाळी बोनस बांधकाम कामगार मंत्र्याकडून माहिती.

बांधकाम कामगार नोंदणी आणि नूतनीकरण आता कामगार सुविधा केंद्रामध्ये

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी या अगोदर ऑनलाईन नोंदणी केली जात होती त्याच प्रमाणे नुतनीकरण देखील ऑनलाईन पद्धतीनेच केले जात होते.

आता मात्र तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कामगार सुविधा केंद्रामध्ये जावून नवीन नोंदणी किंवा नुतनीकरण करावे लागणार असल्याने बांधकाम कामगारांची डोकेदुखी वाढली आहे.

कामगार नोंदणी ऑनलाईन पद्धतीनेच सुरु करावी जेणे करून कोणत्याही कामगारांना नोंदणी करता येईल अशी मागणी देखील कामगार वर्गातून केली जात आहे.

संसारोपयोगी साहित्य अर्थात भांडे योजनेचा अनेकांना मिळाला नाही लाभ

बांधकाम कामगार नोंदणी केल्यानंतर कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो यामधील एक योजना म्हणजे भांडे योजना होय.

गृहपयोगी साहित्य या योजने अंतर्गत बांधकाम कामगारांना भांडे संच उपलब्ध करून दिला जातो. यामध्ये ३० प्रकारचे भांडे असतात. हे भांडे मिळविण्यासाठी बांधकाम कामगारांना एक अर्ज लिहून द्यावा लागतो.

भांडे संच योजना संदर्भातील माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

बांधकाम कामगार भांडे योजना 30 प्रकारचे भांडे मिळणारओरीजनल अर्ज डाउनलोड करा

हि सर्व प्रोसेस पूर्ण केल्यानंतर देखील काही बांधकाम कामगारांना भांडे न मिळाल्याची तक्रार करण्यात आली आहे.

एकूणच काय तर बांधकाम कामगार दिवाळी बोनस वाटप, बांधकाम कामगार नोंदणी करण्याचे अधिकार नोंदीत बांधकाम कामगार संघटनांना द्यावेत अशा मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे.

बातमी पहा

Leave a Comment