लाडकी बहिण योजनेच्या अर्जात बदल पहा सविस्तर माहिती.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये काहीना काही बदल सुरूच आहेत. या योजनेमध्ये कोणकोणते बदल करण्यात आले आहेत या संदर्भातील शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे.
ऑनलाईन अर्जात देखील बदल करण्यात आले आहेत.
ऑनलाईन अर्जात काय बदल झाले आहेत आणि योजनेमध्ये काय बदल झाले आहेत जाणून घेवूयात सविस्तर माहिती.
सगळ्यात आधी जाणून घेवूयात कि मुख्यमंत्री योजनेमध्ये कोणता बदल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा pdf अर्ज उपलब्ध डाउनलोड करा या तारखेला मिळेल 1500 रुपये
लाडकी बहिण योजनेच्या अर्जात बदल शासनाचा नवीन जी आर निर्गमित
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणे सह व्याप्ती वाढवणे बाबत अशा आशयाचा हा जी आर शासनाच्या संकेतस्थळावर दिनांक १२ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
माझी लाडकी बहिण या योजनेमध्ये जो मुख्य बदल झाला आहे तो आपण जाणून घेवूयात.
ज्या महिलांचा नवीन विवाह झाला आहे अशा महिलांचे नाव लगेच राशनकार्डवर येत नाही अशावेळी त्यांच्याकडे विवाहप्रमाणपत्र असेल तर उत्पन्नाचे प्रमाणपत्र म्हणून त्या त्यांच्या पतीचे राशनकार्ड अर्ज करतेवेळी अपलोड करू शकतात.
महिलेचे बँक खाते पोस्टामध्ये तर आता पोस्टाचे खाते देखील ग्राह्य धरले जाणार आहेत.
ऑफलाईन अर्ज करतेवेळी ऑफलाईन अर्जावर जो फोटो असेल त्याच फोटोचा फोटो काढून ऑनलाईन अर्ज करता येईल.
हे मुख्य बदल या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत झाले आहेत.
या जीआर मधील सविस्तर माहिती वाचून घ्या.
ऑनलाईन अर्जात देखील झाला बदल
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वापरण्यात येत असलेले नारीशक्ती दूत ॲप सुरळीत चालावे यासाठी काही महत्वाचे बदल शासनाने ऑनलाईन अर्जामध्ये देखील केलेले आहे पहा काय आहेत ते बदल.
महिलेचे लग्नापूर्वीचे नाव हा पर्याय नवीन समाविष्ट करण्यात आलेला आहे. ॲप अपडेट करण्यापूर्वी हा पर्याय अर्जामध्ये नव्हता.
अर्जदाराचा पत्ता असा शब्द बदलून आता अर्जदाराचा पत्ता आधारकार्ड प्रमाणे व इतर माहिती असा करण्यात आला आहे.
महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का? पर्याय देखील नारी शक्ती दूत ॲप अपडेट करण्यापूर्वी नव्हता आता तो नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे.
नारी शक्ती दूत ॲप अपडेट करण्यापूर्वी कागदपत्रे अपलोड करण्याची साईज १ एमबी होती ती वाढवून आता ५ एमबी करण्यात आली आहे.
महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्र अपलोड करण्याचा नवीन पर्याय देखील आता आला आहे.
अशा प्रकारचे काही महत्वाचे बदल आता नारीशक्ती दुत ॲपमध्ये करण्यात आले असल्याने हे नारीशक्ती दूत ॲप नागरिकांना अपडेट करून घ्यावे लगणार आहे.
अशा प्रकारे मुख्यमंत्री योजना व ऑनलाईन अर्ज अशा दोन्ही मध्ये आता शासनाने बदल केला आहे.